पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रवादाची पार्श्वभूमि नवभारतास प्रसवू पाहणारी ही मंडळी हिंदुस्थानचे प्राथमिक बंडखोर होत. याना मनःपूर्वक वाटत होते की हिंदी समाजाने उराशी कवटाळून धरलेल्या जुन्या बुरसलेल्या धर्मसमाज-संस्था आणि आचारविचार ही उध्वस्त झाल्याशिवाय नवभारताचा उदय होणे शक्य नाही. प्रारंभी ही मंडळी जरी राजकारणात निष्प्रभ व निष्क्रिय होती, तथापि लौकरच अराष्ट्रीय ह्मणून संबोधिला जाणारा हा सुशिक्षित तरुणांचा तांडा अर्वाचीन राष्ट्रवादाचे पितृस्थान पटकाविता झाला. । नव शिक्षित तरुणानी हिंदी राष्ट्रवादाला जन्मास कसे घातले हे पुढे पाहू. तत्पूर्वी त्यांनी कोणत्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी हाती धरल्या १ त्या चळवळींचे महत्त्व काय ? त्यांचा समाजाच्या विचारसरणीवर कसा काय परिणाम झाला १ या गोष्टींचा खल होणे जरूर आहे. कारण या चळवळीनी राष्ट्रवादाची पार्श्वभूमिका तयार केली. इंग्रजी शिक्षणाने नव युवकात चिकित्सक बुद्धि निर्माण झाली. आपले धार्मिक व सामाजिक आचारविचार व चालीरीती, ही मंडळी सूक्ष्म बुद्धिवादाच्या कसास लावू लागली. आपल्या समाजातील शब्दप्रामाण्यबुद्धि, मूर्तिपूजा, देवतासंख्यत्व अंधश्रद्धा, वेडगळ कल्पना, सती, स्त्रीदास्य,बालाविवाह, अखंडवैधव्य, व्याक्तिस्वातंत्र्याभाव, जातिभेद, अस्पृश्यता इत्यादि धार्मिक व सामाजिक चालीरीती हीच आपल्या सामाजिक अवनतीस कारण होत, असे त्याना बुद्धिवादाच्या या दुर्बिणीने दाखवून दिले. युरोपीय राष्ट्रानी अशाप्रकारच्या मध्ययुगीन धार्मिक आणि सामाजिक आचारविचारांची राखरांगोळी केल्यामुळे तेथे बुद्धिवादप्रणीत विज्ञानयुग निर्माण झाले. विज्ञानसहाय्याने त्यानी अखिल विश्व पादाक्रांत केले. अशा राष्ट्रांच्या अग्रभागी असलेल्या ब्रिटनशी हिंदुस्थानची गाठ पडली ह्मणून हिंदुस्थान हरले असे आपल्या राजकीय अधःपतनाचे त्यानी निदान केले. लूथरोत्तर यूरोपमध्ये ज्याप्रमाणे धर्म सुधारणा झाली, तशी