पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १८ राज्य टिकण्याच्याकामी या वर्गाची किती बहुमोलाची मदत झाली, यावरून साम्राज्यवाद्यांचे हे धोरण कसे शहाणपणाचे होते याची स्पष्ट कल्पना येते. इंग्रजी शिक्षणप्रसाराचा तात्कालिक परिणाम असा झाला की येथील समाजातील अत्यंत पुरोगामी द्रव्य बंडाच्यावेळी ब्रिटीश भांडवलशाहीला चिकटून राहिले. | पाश्चात्य शिक्षण घेतलेला येथचा बुद्धिजीवि वर्ग हा ब्रिटीश भांडवलशाहीचा सर्वतोपरी मिंधा बनला. हा वर्ग ब्रिटीश साम्राज्य देवीला आपले तनमन वाहू लागल्यामुळे येथील ब्रिटीश वर्चस्वाचा पाया दृढतर झाला. ब्रिटीश राज्य, न्यायनीति आणि शहाणपणावर उभारलेले, ब्रिटीश राजकीय संस्था देशाला हितकारक अस या वर्गाला मनापासून वाटत होते. हा वर्ग ज्या व्यापारी मध्यम वर्गाचा बौद्धिक प्रतिनिधी होता, तो वर्गच नेस्तनाबूत झाल्यामुळे तो राजकारणात क्रांतिकारी होणे शक्य नव्हते. हाणून तो प्रथमतः राजकारण बाजूस ठेवून देशातील धार्मिक सुधारणेची धुरा वाहू लागला. यामुळे तर, आपल्या समाजातील प्रतिगामी आणि सामाजिक सनातन्यांचा या मंडळीवर फारच घुस्सा होऊ लागला. | ही नव शिक्षित मंडळी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने पाश्चात्य अभिनव शिक्षणाचा आस्वाद घेऊ लागली. अर्वाचीन राजनैतिक तत्वे आणि पुरोगामी सामाजिक तत्त्वज्ञान यांचा अभ्यास ही मंडळी मोठ्या आवडीने व कळकळीने करू लागली. दिवसेदिवस अशा तरुणांची संख्या हजारानी मोजण्यात येऊ लागली.केवळ एतद्देशीय शाळा कॉलेजातच नव्हे,तर विलायती विद्यापीठातही शिक्षण घेण्यासाठी शेकडोगणिक युवक समुद्रपर्यटणासंबंधाचे सामाजिक निर्बध बाजूस सारून धाव घेऊ लागले. आर्य संस्कृति, वेदशास्त्रपुराणपरंपरा इत्यादींचा अभिमान बाळगणान्यांच्या दृष्टीने ही मंडळी अराष्ट्रीय ठरू लागली.स्पेन्सरकॉग्टेप्रणीत धर्म तो यांचा धर्म, बेन्थेमाभलचे तत्वज्ञान ते यांचे तत्वज्ञान. जुन्या जीर्ण वस्तुस्थितीविरुद्ध बंड पुकारून