पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ राष्ट्रवादाची पार्श्वभूमि बुद्धिवादी विचारसरणीच्या प्रसाराचे पर्यवसान अखेर राजकीय आणि सामाजिक क्रांतीत होते असा युरोपीय इतिहासाचा दाखला आहे. आणि या विचारसरणीचा फैलाव ही नूतन शिक्षण घेतलेली मंडळी देशभर करीत होती. तथापि येथील प्रतिगामी सामाजिक शक्तीस तोड देऊन आपल्या राज्यास बळकटी आणणारा असा नवा सुशिक्षित वर्ग उभारणे ब्रिटीशाना भाग पडले. पण काही झाले तरी पाश्चात्य शिक्षण हिंदुस्थानात प्रचलित करण्यात ब्रिटीश भांडवलशाहीने कमालचे धाडस दाखविले यात शंका नाही. त्यामुळे बुद्धिजीवींच्या मनावर प्रतिगामी राष्ट्रवादाची जी मोहिनी पडली होती, तिचा निरास होऊ लागला. पुढे याच बुद्धिजीवि वर्गाने हिंदी राष्ट्रवादाच्या सिद्धांताचा पाया घातला. पाश्चात्य शिक्षण हिंदुस्थानात सुरू करावे असे प्रतिपादणा-या ब्रिटीश मुत्सद्यात मेकॉले हाच अग्रेसर होता. इंग्रजी शिक्षण येथे प्रचलित झाल्याबद्दलचे खरे श्रेय त्यालाच दिले पाहिजे. पुरोगामी पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसाराचा अखेर परिणाम काय होणार याची अगाऊ कल्पना त्याला नव्हती असे नाही. शिक्षणाच्या प्रभावामुळे येथे लोकशाहीसाठी चळवळ सुरू होणार याची त्याला स्पष्ट कल्पना होती, असे त्याच्या १८३३ च्या रिफार्म बिलाच्या चर्चेच्यावेळी पार्लमेंटमध्ये झालेल्या भाषणावरून स्वच्छ होते. मग कोणत्या हेतूने प्रेरित होऊन ब्रिटीश साम्राज्यवाद्यानी येथे पाश्चात्य शिक्षण चालू करण्याचे धाडस केले बरे १ ते ह्मणतात त्याप्रमाणे मागसलेल्या लोकाना सुसंस्कृत करण्याचा भूतदयात्मक पवित्र हेतु त्यांच्या या कृतीच्या बुडाशी होता असे ह्मणणे तर हास्यास्पदच ठरेल ! साहजिकच, ब्रिटीश सरकार हे एक हिंदुस्थानाच्या अत्यंतिक । कल्याणासाठी उभारलेले राज्ययंत्र आहे, त्याच्या तोडीचे पुरोगामी राज्ययंत्र येथील पुरातन परंपरेवर उभारता येणे शक्य नाही, अशी ब्रिटीश सरकारची मनःपूर्वक स्तुतिस्तोत्रे गाणारा बुद्धिजीवि वर्ग येथील समाजात निर्माण होणे साम्राज्यवाद्यांना हवे होते. १८५७ च्या बंडासमयी ब्रिटीश