पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद होते. म्हणून पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार हिंदुस्थानात जारीने करावा असे ते प्रतिपादू लागले. या पुरोगामी विचारसरणीला द्विविध विरोध होता. एक येथील ब्रिटिश अधिका-यांचा. दुसरा एतद्देशीय सनातन्यांचा. या दोन्ही वर्गाच्या विरोधाची कारणेही पण निरनिराळी होती. पहिल्या वर्गाला असे वाटे की, पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाल्याने हिंदी लोक जागे होऊन त्यांचा राजनैतिक दृष्टिकोन विकास पावेल, व अंती ते आपले राज्य परत हिसकावून घेतील. हा त्यांचा अंदाज खरा ठरला हे पुढील इतिहासावरून स्पष्ट होते. याच्या उलट येथील सनातनी घाबरले की पाश्चात्य शिक्षणाने धर्म बुडतो व आपल्या धार्मिक व सामाजिक संस्था खिळखिळ्या होतात. या त्यांच्या भीतीला, हिंदुस्थानांत प्रथम इंग्रजी शाळा चालू करणाच्या खिश्चन मिशनरी मंडळीचे वर्तन कारण होय. | भवति न भवति होउन अखेर हिंदी जनतेला इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पार्लमेंटमध्यें पास झाला आणि पाश्चात्य शिक्षण हिंदुस्थानात प्रचलित करण्याची मुहूर्तमेढ रोविण्यात आली. या ब्रिटिश धोरणाचा सुपरिणाम म्हणजे, १८४० च्या सुमारासच अर्वाचीन विचा रांचा व पुरोगामी प्रवृत्तचिा असा अभिनव सुशिक्षितांचा एक वर्ग अस्तित्वात आला. या वर्गाच्या द्वारे पाश्चात्य देशातील लोकशाही, राष्ट्रवाद समाजक्रांति धर्मसुधारणा इत्यादि कल्पना या देशात पसरू लागल्या. या पुरोगामी कल्पनानी सुशिक्षित तरुणांची डोकी भारून गेली. आर्यसंस्कृति आणि वैदिक परंपरा यांच्या नावाखाली धुडघूस घालून प्रगतिप्रवाह क्षेपविणान्या जुन्या बुरसलेल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक आचारविचाराना मूठमात दिल्याशिवाय अर्वाचीन राष्ट्रांच्या पंक्तीस आपला : देश बसणे शक्य नाही असे त्यांच्या मनानी घेतले. जनतेच्या जुन्या पुराण्या अज्ञ कल्पनाबर अधिष्ठित झालेल्या ब्रिटिश राजवटीलासुद्धा हा अभिनव विचारांचा लोढा अखेर प्राणघातक ठरणारा होता. कारण