पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“१५ राष्ट्रवादाची पार्श्वभूमि पुरोगामी राजनैतिक विचारसरणी देशात प्रसुत करणाच्या परकीय सत्तेविरुद्ध राष्ट्रीय एकजूट बनवू शकली नाही. बहुकालीन अंदाधुंदी आणि अराजकता यामुळे उद्भवलेल्या प्रतिक्रियेतून आपल्या समाजाची मुक्तता झालेली नव्हती. म्हणून तो 'शांतता आणि सुव्यवस्था' याची हमी घेणा-या परकीय राजसत्तेला–मग ती कितीही महाग पडो-चिकटून राहिला. म्हणून १८५७ सालच्या बंडाचा मोड झाला. याच बंडाला स्वातंत्र्ययुद्ध असे सनातनी राष्ट्रवादी म्हणतात. ते बंड दिसायला जरी क्रांतिकारी दिसत होते, तथापि ब्रिटिश सरकारमार्फत हिंदुस्थानांत अवतीर्ण झालेल्या प्रगत आणि पुरोगामी अशा सामाजिक व राजकीय विचारांच्या ‘मूले कुठारः' करणारे होते, या बृष्टीने बंडाचे स्वरूप अत्यंत प्रतिगामी होते. • येथे पार्लमेंटने उभारलेली राज्यपद्धति झाली तरी, पुरोगामी सामाजिक व राजकीय विचार येथील समाजात विकास पावण्यास अडथळा कर‘णारी होती. त्या राज्यपद्धतीने तर अशा विचारांचा नवोदित व्यापारी मध्यम वर्गरूपी पायाच खणून कादिला होता. या राज्यपद्धतीची सर्व भिस्त नवनिर्मित जमिनदार सरदार वर्गावर होती. पण अशा प्रतिगामी वर्गावर आपले राज्य अवलंबून असावे हे ब्रिटीश भांडवलशाहीच्या उदारमतवादी मुत्सद्यापैकी पुष्कळाना पसंत पडेना. हा प्रतिगामी वर्ग केव्हां भडकेल व आपल्या सत्तेवर केव्हा गदा आणील याचा नेम नाही अशी भीति त्यांच्या हृदयात वास करीत होती. तेव्हा अशा प्रतिगामी शक्तींच्या प्रतिकाराविरुद्ध बंदोबस्त म्हणून पुरोगामी पाश्चात्य विद्याविशारद अशा हिंदी बुद्धिजीवी वर्गाचा एक कडेकोट किल्ला उभारावा या मताचे ते पुरस्कर्ते होते. असा बुद्धिजीवी वर्ग उभारल्याने त्यापासून-मातबर मध्यम वर्गाचा आर्थिक पायाच त्याच्या बुडाशी नसल्यामुळे-ब्रिटिश सत्तेला धोका तर प्राप्त होणारच नाही, उलट, सरंजामी सामाजिक प्रतिक्रियेपासून उद्भवणा-या संकटापुढे, तो तिची ढाल बनेल असे त्याना वाटत