पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १४ प्रेरित झालेल्या एतद्देशीय भांडवलदार वर्गाच्या नेतृत्वाखाली झाला असता तर तो खात्रीने यशस्वी झाला असता. पण अशा त-हेचा राष्ट्रीय उठाव त्यावेळी होणे शक्य नव्हते. कारण, क्रांति यशस्वी होण्यास लागणाच्या सामाजिक द्रव्यांचा समाजात पूर्णपणे अभाव होता.ह्मणजे एतद्देशीय भांडवदार वर्गाची अपरिपक्व दशेतच मुस्कटदाबी झाली होती. यंत्रप्रधान भांडवली संस्कृति आणि तिचे पुरोगामी तत्त्वज्ञान ही तत्कालीन हिंदी समाजात खोल रुजू शकली नाहीत. त्यांचा निवळ बहिरंग देखावा मात्र नुकताच कोठे दृग्गोचर होत होता. प्रो. सीली याने १८५७ च्या बंडाचे केलेले निदान फारच मार्मिक आहे. तो ह्मणतो की त्या बंडाला येथील जनतेची सक्रिय सहानुभूति तर नव्हतीच, उलट काही जनसंघ ब्रिटीशांच्या बाजूने लढण्यास तयार होते. पुढे तो असेही विधान करतो की ज्यावेळी बंड हे केवळ बंडच न राहता सार्वजनिक राष्ट्रीय भावनेचे ते प्रदर्शन बनेल, त्याच क्षणाला ब्रिटीश साम्राज्याचे संरक्षण करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. कारण वस्तुतः ब्रिटीश हे हिंदुस्थानचे जेते नसून जेते ह्मणून त्याना हिंदुस्थानात केव्हाही राज्य करता येणार नाही. १८५७ सालच्या बंडाचे प्रधान स्वरूप लष्करी होते. पदच्युत आणि असंतुष्ट बनलेल्या सरंजामी सरदारांच्या गुप्त मसलतीतूनच बंडाची निष्पत्ति झालेली होती. राष्ट्रीय भावनेची काहीशी जाग असणा-या अशा शीख समाजाने तर यावेळी ब्रिटीशाना बहुमूल्य मदत केली. शीखांच्या लष्करी सहाय्यामुळेच इंग्रज सरकारला बंडाचा बीमोड करता आला. याच समारास इंग्रजी शिक्षणप्रसारामुळे अभिनव बुद्धिजीवि वर्ग उदयास आला होता. अर्वाचीन व पुरोगामी विचारसरणीचा हा वर्ग बंडाच्या समयी ब्रिटीश सरकारला पूर्ण पाठिंबा देत होता. विशेषतः लहानसहान एतद्देशीय संस्थानातील काही जनता बंडात सामील झाली होती. सारांश, इतिहासाने मरणाच्या दारात लोटलेली अशी मागसलेली सरंजामी सामाजिक शक्ति ही,