पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रवादाची पार्श्वभूमि भांडवलशाहीने हिंदुस्थानांत उभारलेल्या भांडवलशाही-स्वरूपी सरकारने एतद्देशीय जनतेतील सनातन व प्रतिगामी शक्तीशी गट्टी करून नवोदित व्यापारी आणि बुद्धिजीवि मध्यमवर्गाची गळचेपी केली. याच गळचेपणीची कटु फळे झणजे लागोपाठ उद्भवणारी सामाजिक प्रतिक्रिया आणि तदुत्तर राजकीय निद्रा ही होत. इकडचा नवोदित मातबर मध्यम वर्ग नूतन राज्ययंत्रात भरडून निघाल्यामुळे परकीय आक्रमणास विरोध करण्याची ताकद असणारे एकमेव द्रव्यसुद्धा समाजातून नाहीसे झाले. * शांतता आणि सुव्यवस्था' या नावाखाली परकीय सत्तेने बहुजनसमाजाचा अजाण पाठिंबा मिळविला. देशातील अंदाधुंदीस कंटाळलेला व अस्थिर अर्थ जीवनामुळे थकून भागून शांतलेला हापापलेला आपला समाज बहुकाल टिकणा-या अशा राजनैतिक निद्रेला वश झाला. ही समाजाची निद्रांकित स्थिति सर्व सामान्यपणे इ. स. १७५७ ते १८५७ पर्यंत अशी शंभर वर्षे टिकली असे ह्मणण्यास प्रत्यवाय नाही. याप्रमाणे सामाजिक वातावरण कोंदट असल्यामुळे या काळात कोणतीहि राष्ट्रीय चळवळ येथे बी धरू शकली नाही. ब्रिटीश सत्ता उलथून टाकण्यासाठी १८५७ च्या बंडाच्या रूपाने पहिला मोठा प्रयत्न करण्यात आला हे खरे ! परंतु हा प्रयत्न ह्मणजे देशातील राष्ट्रीय चळवळीचा एक भाग होता असे मात्र ह्मणता येणार नाही. मृत्युपंथास लागलेल्या येथील सरंजामशाहीची ती अंतकालीन किंकाळी होती. या बंडाचे स्वरूप द्विविध होते. हिंदी जनतेचा सामाजिक विकास थोपविणा-या परकीय अंमलाचा नाश करणाच्या उद्देशाने ते उभारले होते, या दृष्टीने बंडाचे स्वरूप क्रांतिकारी होते; परंतु मोंगलांच्या अगर मराठ्यांच्या सरंजामी साम्राज्यशाहीचे पुनरुज्जीवन करण्याचा त्या बंडाचा दंडक समाजविकासदृष्ट्या प्रतिगामी स्वरूपाचा होता. या त्याच्या प्रतिगामित्वामुळेच ते पराभूत झाले. या बंडाचा उठाव, पुरोगामी सामाजिक कल्पना आणि राजकीय कार्यक्रम यानः