पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रवादाची पार्श्वभूमि | ब्रिटीश सत्तेने आपल्या समाजातील पुरोगामी उत्पादन शक्तींची संपूर्ण खच्ची केल्यामुळे लोकशाही, राष्ट्रवाद, समता, स्वातंत्र्य इत्यादि अर्वाचीन राजनैतिक कल्पनांचा प्रादुर्भाव आपल्या समाजात झाला नाही हे आपण गेल्या प्रकरणात पाहिले. येथील सत्ता हाती घेऊन व पुरोगामी सामाजिक शक्ती हतबल करून एवढ्यावरच, ब्रिटीश भांडवलशाही समाधान पावली नाही, तर तिने इकडील जुने पुराणे कृषिप्रधान अर्थकारण (agrarian economy ) पुनरुध्दृत करून हिंदी समाजास शे दोनशे वर्षे मागे खेचले. आता हे मात्र खरे की, तिने येथे उभारलेले सरकार हे भांडवलशाही राज्ययंत्र होते. इकडच्या जुन्या जीर्ण आणि विस्कळीत अशा सरंजामी वेजबाबदार राज्ययंत्रापेक्षा हे अभिनव इंग्रजी राज्ययंत्र पुष्कळ पटाने संघटित आणि सुव्यवस्थित होते. पण काही झटले तरी हे नूतन राज्ययंत्र राष्ट्राभिमानी नव्हते. ते परकीय भांड-. वलशाहीने आपल्या भांडवलदारांच्या उत्कर्षासाठी निर्माण केलेले होते. अर्थात् यूरोपीय भांडवलशाही राज्ययंत्राप्रमाणे ( bourgeois state ) सार्वजनिक शिक्षण, मुद्रणस्वातंत्र्य इत्यादींच्या द्वारा राष्ट्रीय जागृति करण्याचे कार्य, येथच्या परकीय राज्ययंत्राने आपल्या शिरावर घेणे शक्य नव्हते. उलट जनजागृति घडवून आणण्यापेक्षा जनतेला प्राथमिक अज्ञान स्थितीत (primitive ignorance ) ठेवण्यातच इकडील परकीय सत्तेचा स्वार्थमूलक कार्यभाग साधण्याजोगा होता. याच हेतूने यापूर्वी प्रतिपादिल्या-: प्रमाणे सरंजामी राजांची भूते आणि नवोत्पादित जमिनदारी यांच्या सामाजिक पायावर ब्रिटीश राज्ययंत्राची उभारणी झाली. याप्रमाणे ब्रिटीशः