पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ ब्रिटीशपूर्व राष्ट्रवाद ब्रिटीशानी सत्ता काबीज केल्यावर, प्रथम येथील नवोदित व्यापारी भांडवलदार वर्ग ( commercial bourgeoisie ) नेस्तनाबूत केला, आपल्याला कायमचा टेकू मिळावा ह्मणून अभिनव जमिनदार पद्धति निर्माण केली आणि ती पद्धत आणि हतबल एतद्देशीय संस्थाने यांचा मजबूत पाया बनवून त्यावर साम्राज्य राज्ययंत्राची ( Imperialist State ) उभारणी केली. शेतकरी आणि कारागीर या वगना परत भूदास्य पत्करावे लागले. ब्रिटीश उद्योगधंद्याचा परमोत्कर्ष करू पाहणा-या अभिनव साम्राज्यवादी शासनयंत्राच्या दडपणाखाली उदयोन्मुख हिंदी भांडवलदारी मुळातच - खुरडिली गेली. अर्थातच देशाची आर्थिक कोंडमारा होऊन हिंदी -समाजाची प्रगति स्थगित झाली. तात्पर्य, राष्ट्रवादाला जन्म देणे, भांडवलशाही लोकसत्ता स्थापन करणे, सरंजामी पाशातून शेतकरी वर्गाचे विमोचन करणे इत्यादि प्रमुख कार्ये घडवून आणण्याचे सामर्थ्य भांडवलदार वर्गात असते, तोच जेथे घायाळ होऊन पडला, तेथे तो हिंदी राष्ट्रवादास कसचा जन्म देणार ? मग हिंदी राष्ट्रवादास प्रसविण्याचे ऐतिहासिक कार्य कोणी केले ? केव्हा केले १ ही जबाबदारी अर्थात पुढे शंभर वर्षांनी ब्रिटीश कृपाछत्राखाली वाढलेल्या नव्या हिंदी भांडवलदार वर्गाचे नेतृत्व पत्करणा-या बुद्धिजीवि मध्यम वर्गावर पडली, झणजे १८७०।१८८० च्या सुमारास ब्रिटिश कृपांकित अभिनव भांडवलदार वर्गाच्या मध्यम वर्गीय बुद्धिजीवि पुढाम्यानी हिंदी राष्ट्रवादास जन्म दिला. हे कसे ते विषयानुषंगाने पुढे विवाचले जाईल. पण सध्या पुढील प्रकरणांत ब्रिटीश या देशात सुस्थिर झाल्यानंतर आपल्या देशावर त्याचा काय परिणाम झाला आणि त्यातूनच पुढे कोणकोणती विविध आंदोलने आपल्या देशात डोल लागली हे पाहू.