पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• १२ हिंदी राष्ट्रवाद वर्गातून सैन्य जमवून इंग्रजानी एकामागून एक अशा हिंदी सरंजामी राजांचा पाडाव केला. यावरून सरंजामशाहीचा पायाच असा जो शेतकरी तोच तिला उखडून काढण्यास सज्ज झाला हे सिद्ध होत नाही काय ? सारांश, सरंजामशाहीस उलथन टाकणा-या शक्ति १८ व्या शतकाच्या हिंदी समाज घटनेत प्रादुर्भत झाल्या होत्या. पण दुर्देव हे की हिंदी भांडवलशाहीला त्या शक्तीच्या जोरावर युरोपातल्याप्रमाणे राज्यक्रांति आणि तदुत्तर सामाजिक विकास ही घडवून आणता आली नाहीत. उलट या आणीबाणीच्या प्रसंगी कंपनीरूपांतरित ब्रिटीश भांडवलशाही दत्त झणून उभी राहिली ! तिने समाजात वावरणाच्या क्रांतिग्रवण शक्तीना काबूत आणिले; सरंजामी नवाबराजांच्या हातून सत्ता हरण केली; अखेर नवोदित कारखानदारीरूप पुरोगाम सामाजिक शक्तीचा कोंडमारा करून हिंदी राष्ट्राचा विकास खुंटविला. यूरोपमधल्या १७ व्या आणि १८ व्या शतकातील नवोदित भांडवलशाहीने ( Rising bourgeoisie ) द्विविध क्रांतिकार्य केले. पहिले यूरोपातली सरंजामी सत्ता उलथून टाकण्याचे, आणि दुसरे यूरोपीय राष्ट्रांचा औद्योगिक विकास घडवून आणण्याचे. या दोन कार्यापैकी हिंदी सरंजामी सत्ता पादाक्रांत करून तिच्याऐवजी भांडवलशाही राज्ययंत्र उभारण्याचे एक क्रांतिकार्य ब्रिटीशानी पार पाडले. परंतु तदुत्तर हिंदुस्थानचे औद्योगीकरण घडवून आणण्याचे सामाजिक क्रांतिकार्य त्यानी टाळले. उलट वसाहती पिळणारे राज्ययंत्र (colonial state ) येथे उभारण्यात येऊन ज्या नवोदित कारखानदारी सामाजिक शक्तीनी ब्रिटीशाना सत्ता प्रस्थापित करण्यास हात दिला होता, त्यांचीच मुस्कटदाबी करण्यात आली. याला कारण, येथचा व्यापारी कारखानदार वर्ग उत्कर्ष पावून प्रबळ झाला, तर परकीय आक्रमणपासून तो आपल्या मायदेशाची मुक्तता करील, ही भीति ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या हृदयात सतत वास करीत होती. ह्मणून