पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रिटीशपूर्व राष्ट्रवाद १८ व्या शतकातील सतत लढाया लूट चालविणा-या येथील सरंजामी राजांच्या अंमलाला, शेतकरी, व्यापारी, कारागीर, बुद्धिजीवि असे सर्व वर्ग हाणजे, राजेरजवाडे आणि त्यांचे साथीदार हस्तक वगळले असता, बहुतेक सर्व हिंदी समाज कंटाळलेला होता. त्यामुळे अखिल जनतेला इंग्रज हे येथे शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी ईश्वराने मुद्दाम पाठविलेले दूत आहेत असे वाटू लागले. हेच ब्रिटीशांच्या यशातील खरे मर्म होय. या वस्तुस्थितिशिवाय सहा हजार मैलावरून केवळ व्यापारासाठी येणारे मूठभर इस्ट इंडिया कंपनीचे लोक सर्व देश सहज लीलेने काबीज करतात, या गोष्टीचा उलगडा होणे शक्य नाही. याठिकाणी आणखी एका परिस्थितीचा विशदपणे उल्लेख करणे अत्यवश्य आहे. यावेळी सरंजामी समाजपद्धतीचा काळ निघून गेला होता. केवळ शेतीच्या व वैयक्तिक कारागिरी उत्पादनावर समाजाचा उदर निर्वाह होणे अशक्य झाले होते. समाजाच्या उत्पादनशक्ती खुल्या करून त्यात नवजीवन निर्माण करण्यास नूतन सामाजिक शक्तीची अत्यंत जरूरी होती, ती सामाजिक शक्ति हाणजे कारखानदारी ( Large Scale production ) होय. तिचा उदयही झाला होता, पण तिच्या उत्कर्षास अनुकूल असे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणारे मध्यवर्ति प्रबळ राज्ययंत्र उभारण्यात आले नाही. ह्मणून या सामाजिक शक्तीने, आत्मविकासार्थ, ब्रिटीशानी येथे उभारलेल्या भांडवल. शाही राज्ययंत्राकडे ( Boungeois state ) धाव घेतली. ब्रिटिशानी त्या शक्तीचा पुरेपूर फायदा घेतल्यावर, झणजे तिच्या मदतीने येथची सरंजामझाही उध्वस्त केल्यानंतर, ब्रिटिश कारखानदारीच्या उत्कर्षास, ती शक्ति अडथळा करू लागली हाणून तिलाही कापून कादिले. याप्रमाणे हिंदी जनतेला सरंजामशाहीच्या पाशातून मुक्त करण्याचे श्रेय सुसंपन्न अशा नवोदित मध्यम वर्गीस न मिळता, ते, कंपनीरूप ब्रिटीश भांडवलशाहीने त्या वर्गापासून हिरावून घेतले. एतद्देशीय शेतकरी