पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद लोकांचे, राजसत्तवर लोकप्रतिनिधाचे संपूर्ण नियंत्रण हवे इत्यादि लोकशाही कल्पना जनतेत पेरून तिचा पाठिंबा घेऊन, लोकसत्ताक राज्ययंत्र उभारण्याचे सामर्थ्य या नुकत्याच उदयास आलेल्या व्यापारी वर्गात आलेले नव्हते. त्यामुळे मागलानंतरं, या देशात भांडवलशाही लोकसत्ता निर्माण होगाऐवजी मराठ्यांचे सरंजामी साम्राज्यच प्रामुख्याने नांदू लागले. | मराठी सतेने या नूतन बगचा उपयोग अपल्या राज्याच्या बळकटीस केला असता आणि देशात उद्योगधंदा वाढीवा ह्मणून सर्वत्र शांतता-सुव्यवस्था निर्माण केली असती,तर इंग्लंड फ्रान्स आदि पाश्चात्य देशातल्याप्रमाणेच येथली भांडवलशाही उत्कर्ष पावून राष्ट्रवादास जन्म देती आणि लोकशाही स्थापन करती ! अशा त-हेचा आर्थिक दृष्टिकोन येथील कोणत्याही सत्तेला प्राप्त झाला नव्हता. देशात विचारक्रांति होऊन समाजाचा सांस्कृतिक विकासही झाला नव्हता, समाजातील धर्मश्रद्धेचे कान सरासरविचार की पट्टकाविले नव्हते. युरोपातल्याप्रमाणे धर्मसुधारणेची चळवळ लोकजागृति करण्याइतकी प्रभाव पावू शकली नव्हती. अशा परिस्थितील धर्मभावनेवर आधारलेला मराठी सत्तेचा देशाभिमान कुचकामाचा ठरला. एकत्रित हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचा मराठी सत्तेचा कार्यक्रम फोल झाला. उत्तर मराठेशाहीत तर मराठ्यानी मुलुखगिरीचा अवलंब करून देश हैराण करून सोडला. मराठे आदिकरून तत्कालीन राजेराजवाड्यानी देशभर लूट चालवून शेती, व्यापार, धंदा धुळीस न मिळविता देशात शांति आणि व्यवस्था प्रस्थापित केली असती, तर नवोदित संपन्न अशा व्यापारी वर्गाने आपले तन-मन-धन इंग्रजास कशाला वाहिले असते. ? या परिस्थितीचा फायदा, अर्वाचीन राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यावर आधारलेल्या ब्रिटिश भांडवलशाहीने घेतला, आणि नवोदित व्यापारी वर्गाचे पाठबळ मिळवून येथील सरंजामशाहीची कंबर मोडिली.