पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रिटीशपूर्व राष्ट्रवाद नुकताच कोठे उदयास येत होता. तो विकास पावून पुढे मागे सरंजामी सत्ताही काबीज करू शकता, पग ईस्ट इंडिया कंपनीरूप ब्रिटिश भांडवलशाहीने ‘हा हन्त हन्त नालिनीं गज उज्जहार' या सुभाषितानुरूप हिंदी उदयोन्मुख भांडवलदारवर्गाच्या तोंडचा सत्तेचा घास हरण केला. नाहीतर, इंग्लंडफ्रान्समधल्याप्रमाण भांडवलशाहीने येथेही राष्ट्रवाद निर्माण करून लोकसत्ता स्थापिली असती. सारांश, प्राचीन काली शकयवनहूणादिकांच्या स्वान्यामुळे, तदुत्तर परकीय मुसलमानाच्या सतत ६०० वर्षे चालू असलेल्या हल्ल्यामुळे आणखी गेल्या दोन शतकातील ब्रिटिश आक्रमणाने, गेली दोन हजार वर्ष आपला समाज पुढील प्रगतीचा टप्पा गाटू शकला नाही. आहे त्याच परिस्थितीत तो खितपत पडलेला आहे. | ब्रिटिश भांडवलशाहीने हिंदुस्थान पादाक्रांत केला नसता, तर हिंदुस्थान में सांप्रतच्याप्रमाणे एक राष्ट्र न बनता युरोपप्रमाणे निरनिराळ्या आर्थिक व सामाजिक विकासावस्थेत असलेल्या अनेक राष्ट्रांचे खंड बनले असते. वेगवेगळ्या आचारविचारांचे परस्परविरोधी असे अनेक समाज-ब्रिटिश सत्तेच्या अभावी--एकत्रित होऊन सर्व हिंदुस्थानचे एक राष्ट्र बनणे शक्य नव्हते, असे १८ व्या शतकाच्या आरंभापर्यंतच्या एकंदर वस्तुस्थितीवरून वाटते. १८ व्या शतकारंभी मोंगलांचे सरंजामी साम्राज्य कोलमडून पडले. त्याला कारण मराठे, शीख, रजपूत इत्यादींच्या एतद्देशीय सरंजामशाहीने उचल खाली हे होय. असे वर निदिष्ट केलेले आहेच. याकाळात आर्थिक उत्पादन हे, खेड्यापुरते मर्यादित न राहता, चोहोकडे देशभर पसरून प्रचंड कारागिरांच्या कारखान्यानी भरलेली अशी अनेक शहरे वसवू लागले. या शहरात प्रचंड प्रमाणावर व्यापार करणारा असा सुसंपन्न मध्यम वर्ग अवतरू लागला होता. हा वर्ग तत्कालीन सरंजामी राजाना वेळोवेळी द्रव्य पुरवून आपल्या नियंत्रणाखाली ठेवू लागला होता. पण युरोपातल्याप्रमाणे येथील सरंजामी सत्तेला उलथून टाकण्यासाठी, राष्ट्र हैं।