पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ हिंदी राष्ट्रवाद शिवाजीचा उदय व ब्रिटिश लोकसत्तेचा उदय ही समकालीन होत, शिवाजीने स्वराज्याची शपथ घेतली त्याच सुमारास इंग्लीश जनतेने पहिल्या चार्लस राजास फाशी दिले. शिवाजीनंतर लगेच शीख आणि रजपूत यानी उचल घेतली. या त्रयीचे बंड ह्मणजे हिंदी समाजाची वाढ खुटविणा-या परक्या मुसलमानी सरंजामशाहीविरुद्ध एतद्देशीय सरंजामशाहांचे यशस्वी बंड होय. शिवाजीने स्वराज्य स्थापिल्यावर एतद्देशीय सरंजामशाही फोफावली. १८ शतकात ती मध्यवर्ति एकत्रित राजसत्ता निर्माण करणार अशी चिन्हेही दिसू लागली. याच सुमारास ह्मणजे १८ व्या शतकाच्या मध्यकाली उदयोन्मुख सुसंपन्न असा व्यापारी मध्यमवर्ग हिंदभूमीच्या क्षितिजावर चमकू लागला होता. सोळासतराव्या शतकातील प्रबळ मोंगली सत्तेमुळे आणि तदुत्तर प्रभावी ठरलेल्या शीख मराठ्यांच्या एतद्देशीय सरंजामशाहीमुळे वायव्य दिशेकडून येणा-या परक्या मसलमानांच्या स्वान्याना पायबंद बसला. डच, इंग्लीश, पोर्तुगीज इत्यादि युरोपीय प्रवाशांच्या द्वारे हिंदुस्थानचा जगाशी जोराचा व्यापार आणि दळणवळण ही सुरू झाली. या समग्र वस्तुस्थितीचा परिणाम झणजेच सुसंपन्न अशा हिंदी मध्यम व्यापारी वर्गाचा उदय. याच वेळी आणखी एक योग जमून आला. तो ह्मणजे ब्रिटिश भांडवलशाही ही आपली भूमि निष्कंटक करून, विश्व पादाक्रांत करण्याच्या मार्गास लागली असता, हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपात अकस्मात अवतीर्ण झाली. येथील चक्रवर्ति राजसत्ता काबीज करण्याच्या कामी येथील सरंजामशाहीची ती प्रतिस्पर्धी बनली. पुढे १७५७ पासून १८५७ पर्यंत असा सतत शंभर वर्षे येथील सरंजामशाही आणि ब्रिटिश भांडवलशाही यामध्ये लढा चालला. त्यात सरंजामशाही हार पावून ब्रिटिश पार्लमेंटची अनियंत्रित सत्ता अखिल हिंदुस्थानभर प्रस्थापित झाली. । ब्रिटिश भांडलवशाही येथे आलीच नसती, तर काय झाले असते ? युरोपातल्याप्रमाणे हिंदुस्थानात व्यापारी व कारखानदार असा मध्यमवर्ग