पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रिटीशपूर्व राष्ट्रवाद आणून राष्ट्रवाद व मयादित लोकसत्ता निर्माण करणारा असा प्रभावी श्रीमान व्यापारी मध्यम वर्ग येथे निपजलाच नाही. . अशा प्रकारचा वर्ग निर्माण होण्यास देशात शांतता आणि सुव्यवस्था असावी लागते. त्यांचे अस्तित्व फक्त प्रबळ अशा मध्यवर्ति एकत्रित राजसत्तेखालीच ( centralised teulal state ) असू शकते. अशा त-हेची सरंजामी सत्ता काही अशी रजपूत, मराठे आणि शीख यांच्या मध्ये पादुर्भूत झाली होती. मराठेशाहीत तिला व्यापक स्वरूपही प्राप्त झाले होते. मोंगलशाहीत अशी प्रबल सत्ता होती. तथापि ती परकीय असल्यामुळे समाजप्रगतीस पोषक होऊ शकली नाही. मुसलमानांच्या वारंवार होणा-या स्वाच्या येथल्या सरंजामी समाजाच्या स्वतंत्र विकासास प्रचंड अडथळा करीत होत्या. कारण, राजकीय सत्ता ह्मणजे अखिल जनतेच्या सर्वश्रेष्ट इच्छाशक्तीचा (Sovereign will ) आविष्कार आहे, ही कल्पना परक्या अमलाखाली रुजून फोफावणे शक्य नसते. पुढे शिवाजीने परकीय अमलाविरुद्ध बंड केले. जहागिरीदारांचे निर्मूलन करून एकत्रित सरंजामी सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे व्यापारास उत्तेजन मिळू लागले. त्याच्या राजकीय वंशजानी त्याचेच धोरण पुढे चालू ठेविले असते, तर सर्व हिंदुस्थानभर मराठी सत्तेचे मध्यवर्ति एकत्रित सरंजामी राज्ययंत्र निर्माण झाले असते. या सत्तेखाली प्रबळ व्यापारी मध्यम वर्ग निर्माण झाला असता आणि त्याने युरोपातल्याप्रमाणे येथे भांडवलशाही लोकसत्ता (bourgeois democracy ) प्रस्थापिली असती. तथापि राष्ट्रवादाचा उगम पहिल्या प्रथम मराठी सत्तेखाली झाला हे कोणालाही नाकबूल करता येणार नाही. परंतु तो राष्ट्रवाद समाजात नवजीवन निर्माण करणारा असा नव्हता तर पूर्वपरंपरेवर हिंदुधर्मनिष्ठेवर आधारलेला असा सरंजामी स्वरूपाचा होता ! त्या राष्ट्रवादाला हिंदु राष्ट्रवाद ह्मणता येईल. सावरकरवाद हा झाला तरी हिंदु राष्ट्रवादाचीच पुस्ती होय.