पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद यांच्यावर ह्मणजे जागतिक अर्थकारणावर आपला ताबा प्रस्थापित व्हावा झणून या वर्गाने धमनुशासित सरंजामी सत्तेशी झगडा आराभला. तत्कालीन सरंजामी सत्ता ही सामाजिक उत्पादनात व्यत्यय आणू लागली. अशा प्रसंगी या भांडवलदार वर्गाने, प्रथम इंग्लंडात आणि नंतर अन्य युरोपीय देशात, आपापल्या देशातील जनतेचा पाठिंबा मिळवून, सत्ता ही राजाचा नसून राष्ट्ररूपी अखिल प्रजेची आहे, असा राष्ट्रवादाचा नवा सिद्धान्त उद्धत केला आणि धर्मानुशासित एकतंत्री राजसत्ता उलथून टाकली. याचा परिणाम असा झाला की या नवीन बराने घडवून आणलेल्या औद्योगिक क्रांमुळे निरनिराळे : वंश, जाति, भाषा, संस्कृति इत्यादि विषयक भेदभाव पार वितळून जाऊन त्यांचे स्थान राष्ट्रीय स्निग्धतेने ( National collesion ) पटकाविले. या प्रकारे युरोपात राष्ट्रवाद, लोकशाही वगैरे तत्त्वांचा उदय होऊन नवयुग निर्माण झाले. पण अशा त-हेचा राष्ट्रवाद उप्तन्न होण्यास अवश्य लागणारा आर्थिक विकास ब्रिटिशपूर्वकालीन हिंदुस्थानात केव्हाही झालेला नव्हता. युरोपातल्याप्रमाणेच भारतीय समाज सुद्धा प्राथमिक, वणश्रम, सरंजामी इत्यादि साधारणतः समान युगाच्या उत्क्रांतिपथातून विकास पावत आला आहे. इतकेच नव्हे, तर यूरोप हा गुलामगिरीतच खितपत पडला असता आपल्या समाजाने सरंजामी युगात पदार्पण केले होते. विविध शास्त्रे, तत्वज्ञान, शिल्पकला, कारागिरी यामध्ये बरीच खाडी मारलेली होती. परदेशाशी व्यापार व उद्योगधंदे याना बरकत आली होती. पण ही वस्तुस्थिति फार वेळ टिकली नाही. मौर्य कालानंतर शक, यवन, युचि हूण, श्वेतहूण इत्यादि परकीयांच्या स्वा-यानी हिंदुस्थानास सुमारे हजार वर्षे पछाडिले व समाजाची प्रगति खुटविली. पुढे मुसलमानांच्या स्वान्यामुळे तर देशातील स्वास्थ्य नाहीसे झाले. देशभर बेबंदशाही माजली. यामुळे जमीन सुपीक असून पुरेसे उद्योगधंदे प्रचलित असताही, अठराव्या शतकाच्या आरंभापर्यत, औद्योगिक क्रांति घडवून