पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ब्रिटीशपूर्व राष्ट्रवाद युरोपीय समाजाची आजवर एकंदर चार स्थित्यंतरे झाला. या पुढे तो पाचव्या स्थित्यंतरात पदार्पण करणार आहे. ती चार ह्मणजे प्राथमिक साम्य युग (primitive cominunism ) दास्ययुग, संरजामी युग आणि भांडवलशाही ही होत. आपला भारतीय समाज अशाच स्थित्यंतरातून उत्क्रांत झालेला आहे. किंबहुना सतराव्या शतकाच्या आरंभापर्यत दोन्ही समाजाचा विकास सामान्यतः एकसारखाच होत असलेला आढळून येतो. आरंभी समाजाच्या रानटी काळात झणजे प्राथमिक साम्य व दास्य या युगद्वयात मानव हा मृगयेवर आपला चारतार्थ चालवीत असता, जमिनीतून पीक काढण्यास शिकतो व निरनिराळ्या टोळ्या करून राहता. पुढे या टोळ्यामध्ये सुपीक जमिनीसाठी झगडा सुरू होतो. प्रबळ टोळी कमकुवत टोळ्याना जिंकून आत्मसात् करते व जिंकलेल्या प्रदेशावर राज्य करू लागते. त्या टोळीचा स्वामी काबीज केलेल्या सर्व भूभागाचा राजा बनतो. या क्रमानुसारच इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क इत्यादि युरोपीय राज्ये अस्तित्वात आली. तीनशे वर्षापूर्वी ही राज्ये राष्ट्रीय जागृतीने एकत्रित झालेली नव्हती. या राज्यांचे तत्कालीन स्वरूप ईश्वरानुशासित अगर धर्मानुशासित सरंजामी राजसत्ता ( theocratic feudal monarchy ) हे होते. या राज्यांचे अधिष्ठान धर्मनिष्टा व नृपनिष्ठा हे होते. त्याकाळी राजा व पाद्री या कल्पित ईश्वरांशात सर्व सत्ता केंद्रित होती. ही वस्तुस्थिति १६ व्या शतकाच्या अखेर पावेतो | हिंदुस्थान व यूरोप या दोन्ही भूखंडात सर्व साधारणपणे सारखी उन्नत झालेली होती. पण सतराव्या शतकात प्रारंभी इंग्लंडातील सरंजामी समाजाच्या गर्भात नूतन व्यापारी मध्यम वर्ग निर्माण झाला. त्या वर्गाने उत्पादनात क्रांति घडवून आणली. जगड्ड्याळ व्यापार पेठ वसविली. जगाला मालपुरवठा करण्यासाठी कारखानदारी अस्तित्वात आली. नवा भांडवलदार वर्ग निर्माण झाला. युरोपातील अन्य देशही इंग्लंडच्या पाऊलावर पावले टाकू लागले. मालांचे उत्पादन विभाजन आणि विनिमय