पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ हिंदी राष्ट्रवाद राष्ट्रवादाची कल्पना ही समाजविकासक्रमाच्या एका विशिष्ट अवस्थेतच प्रादुर्भूत होत असते. अमुक एका भौगोलिक प्रदेशात वास करणा-या अनेक जनसमुदायांच्या विशिष्ट आर्थिक विकासाचे फळ हाणजे राष्ट्रवाद. आर्थिक शक्तींच्या दडपणाखालीच समपरिस्थितीत राहणा-या विविध जनसमुदायांचे राष्ट्रीय एकीकरण होते. जोवर अशा शक्तचा पुरेसा विकास झालेला नसतो, तोंवर रा वादाची कल्पनाच लोकांच्या डोक्यात उद्भवू शकत नाही. या नियमाला आपला देश हा अपवाद नाही. समुद्रवलयांकित असे हिंदुस्थानचे द्वीपकल्याणजे आशिया खंडापासून हिमालयाच्या नैसर्गिक भिंताडाने पृथक् केलेला भौगोलिक आविष्कार होय. अशा त-हेची निवळ भौगोलिक आविष्कृति ही हिंदुस्थानात निवासणाच्या विविध जनसंघामध्ये राष्ट्रवादाची कल्पना प्रसवू शकत नाही. अनेक भाषा व विविध संस्कृती यामुळे अलिप्त राहिलेले नानाविध वंश आणि जाति यांचे एकत्रित राष्ट्रीकरण होण्यास देशातील उत्पादनशक्तींच्या विकासाची आवश्यकता लागते. हिंदुस्थानातील जनता जोपर्यंत खेड्यातील ग्रामपंचायत, बाराबलुतेदार, जाति इत्यादि संस्थामध्ये आत्मनिष्ठ, आत्मतृप्त अशा वस्तुस्थितीत कालक्रमणा करीत होती, व्यापारी व औद्योगिक दळणवळणाने सूत्रबद्ध झालेली नव्हती, तोपर्यंत राष्ट्रवादाच्या उत्पत्तीस भौगोलिक परिस्थितीची कितीही अनुकूलता असली तरी तेथे राष्ट्रवादाच्या कल्पनेचा उदय होणे शक्य नव्हते. | मग हिंदी राष्ट्रवादाचा उगम केव्हा झाला ? ब्रिटिश राजवटीत का तत्पूर्वी १ ब्रिटिश छत्राखाली झाला असल्यास तो तत्पूर्वी का झाला नाही ? राष्ट्रवादाचे बी येथेच उगवले का ते युरोपातून आणण्यात आले ? समाजविकासक्रमाच्या कोणत्या अवस्थेत राष्ट्रवाद उद्भवतो ? त्यासाठी अर्थोत्पादन शक्ती विकसित व्हाव्या लागतात असे वर ह्मटले आहे. त्याचा अर्थ काय ? यासंबंधी युरोपीय इतिहासाचा काय दाखला आहे १ ।