पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १५० कल्पना नव्वद वर्षापूर्वी येणे शक्य नव्हते. माक्र्सला असे वाटले होते की प्रत्येक देशातील कामगार आपापल्या देशातील भांडवलशाही नष्ट करून आपापल्या राष्ट्रात समाजशाही युग निर्माण करील. जागतिक नाझीवाद विरुध्द जागतिक लोकशाही या आंतरराष्ट्रीय वर्गयुध्दाची कल्पना मार्क्सला सुचणेच अशक्य होय. ह्मणून माक्र्सने आपल्या विज्ञानप्रणीत दृष्टीने वर्तविलेल्या भविष्याचा अर्थ हल्लीच्या काळास अनुसरून केला तर, आमी वर दिद्गर्शित केल्याप्रमाणे नाझीवादाचा नायनाट करून विजयी झालेल्या क्रांतिवादी लोकशाही शक्तीच हिंदुस्थानचा उध्दार करू शकतील असे दिसते. पण या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास आपल्या देशातील पुरोगामी लोकशाही शक्ती सतत जागृत व संघटित ठेवणे जरूर आहे, हेच आपल्याला खराखुरा राष्ट्रवाद ह्मणजे क्रांतिवाद सांगतो. तात्पर्य, राष्ट्रीय क्रांतिवाद हा आता आंतरराष्ट्रीय क्रांतीवादाशी समरस झालेला आहे. आणि त्याचे भवितव्य हेही आंतरराष्ट्रीय क्रांतिवादाशीं संपूर्ण निगडित झालेले आहे. या दृष्टीने विचार केल्यास हिंदी राष्ट्राच्या भवितव्याबद्दल निराश होण्याचे कारण नाही.