पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४९ क्रांतिवाद मिरात कित्येक शतके चाचपड़त पडून राहण्याची पाळी येईल, याची कल्पनाच करवत नाही. इसवी सनाच्या प्रारंभ काळात ज्याप्रमाणे यूरोपच्या रानटी टोळ्यानी ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा नायनाट करून हजार दीड हजार वर्षांपर्यंत टिकणारा तमोयुगाचा अंमल चालू केला, त्याचप्रमाणे नाझी प्रवर्तक नव्या तिमिरयुगाचा अंमल या भूतलावर किती काळ टिकेल हे देवचः जाणे! पण जगावर असा प्रसंग पातण्याचा संभव कमी,सोव्हिएट रशियाचा अफाट प्रदेश, लाल सेना व गनिमी टोळ्यानी जर्मन सेनेचा चालविलेला संहार, तीन पंचवार्षिक कार्यक्रमांनी सोव्हिएट रशियानी वाढविलेले आपले यंत्र-सामर्थ्य, इंग्लंड अमेरिकेपासून मिळणारे सहाय्य या सर्व गोष्टी लक्षात घेता अंतिम विजयश्री सोव्हिएट रशियाला वरणार हे खास दिसते. असे झाले तर मात्र यूरोपभर शांतिपूर्ण क्रांत्या होऊन ख-याखुन्या लोकशाहीचा अंमल ( पार्लमेंटरी ह्मणजे भांडवली लोकशाहीचा नव्हे ) चालू होईल. त्याचा फायदा आशिया-आफ्रिका खंडातील जनतेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. विजयी झालेल्या क्रांतिवादी लोकशाही शक्ती जगातल्या इतर राष्ट्रात क्रांति घडवून आणून तेथेही लोकशाहीचा अंमल सुरू करण्यास सहाय्य केल्याशिवाय राहणार नाहीत. जागतिक नाझीवादाशी झगडणा-या दोस्तांच्या क्रांतिवादी सैन्यानी इराणात घडवून आणलेली राज्यक्रांति, कित्येक वर्षे कुंचविलेल्या इराणीय समाजाची मुक्तता इत्यादि, विजयपथारूढ अशा ख-या लोकशाही शक्तींची ‘ प्रसादचिन्हानि पुरःफुलानि ' ह्मणण्यास हरकत नाही. सारांश, हिंदी जनता जर संघटनेच्या जोरावर ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या पकडीतून आपली सुटका करून घेऊ शकली नाही, तर ब्रिटिश भांडवलशाहीकडून सत्ता हिसकावून घेणारा कामगार हिंदुस्थानची मुक्तता होण्यास मदत करील असे माक्र्सने वर्तविलेले भविष्य खरे होईलसे वाटते. आता,मार्क्सला भांडवलशाहीने सध्या धारण केलेल्या झोटिंगशाहीच्या स्वरूपाची व तिच्या विरुध्द सांप्रत चाललेल्या जागतिक लोकशाही लढ्याची