पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १४८ सहज प्राप्त करून घेता आले असते. पण ५ प्राप्तीचिये वेळे। निदैवा आंधळेपणाचे डोहळे । जे आसते आपुले डोळे । आपणचि झाकी ” या ज्ञानेश्वरमहाराजांच्या उक्तीप्रमाणे काँग्रेसला प्राप्त संधीचा फायदा घेण्याऐवजी तुरुंगात जाऊन बसण्याची बुद्धि आठवली याला काय ह्मणावे ? ।। । ब्रिटन हे सोव्हिएट रशियासहसमवेत जागतिक लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढत असता, हिंदुस्थानातील २।३ पक्ष वगळले असता बहुतेक सर्व बहुसंख्य पक्ष युध्दास विरोध का करतात याचे कारण शोधून काढले पाहिजे. आमच्यामते ते कारण ह्मणजे ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या, सतत गेली दोनशे वर्षे चालविलेल्या कमालीच्या पिळणुकीमुळे प्रत्येक हिंदी मनुध्याच्या मनात ब्रिटिश-विरोधी भावना वास करीत आहे, ती भावना (ब्रिटनने हुकूमशाही विरुध्द लोकशाही या लढ्यात पुढाकार घेतल्याकारणाने) हिंदी जनतेस जागतिक लोकशाहीच्या बाजूने लढू देत नाही. ब्रिटिशांच्या खांद्यास खांदा लावून लढणे हिंदी जनतेस कसेसेच वाटते ! परंतु हुकूमशाहीच्या पाडावात आणि लोकशाहीच्या विजयात जगाचे व त्याबरोबर हिंदुस्थानचे उज्वल भवितव्य अंतर्भूत आहे, हे ओळखून ख-या राष्ट्रवाद्याने लोकशाहीच्या बाजूने मनःपूर्वक लढण्यास पुढे सरसावले पाहिजे. ब्रिटिश विरोधी भावनेने एक अनिष्ट साधलेले आहे. ते कोणते, तर हिंदुस्थानातील युद्धापूर्वीच्या क्रांतिकारी शक्ती युद्धोत्तर युद्धविरोध करून जागतिक प्रतिक्रांतीस ह्मणजे फॅसिझमला पर्यायेकरून सहाय्य करीत आहेत. अशा परिस्थितीत हिंदी राष्ट्राचे भवितव्य काय ? हिंदुस्थानात हिंदी राष्ट्रीय क्रांतीचा कार्यक्रम ह्मणजे लोकसत्तेची प्रस्थापना-शेतकरी क्रांति औद्योगीकरण इत्यादि कार्यक्रम कसा अमलात यावयाचा? अर्थात् , हिंदुस्थानचे भवितव्य आता जागतिक भवितव्यावर अवलंबून आहे. सांप्रतच्या युध्दात नाझींचा जय झाला तर विज्ञानप्रणीत संस्कृतीचा विध्वंस आणि मध्ययुगीन झोटिंगशाहीचा अंमल ही सुरू होऊन जगाला पुनः अज्ञानति