पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ क्रांतिवाद उडवून दिला. लागलेच चर्चिलचे नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आणि त्याने युद्ध जारीने, जोमाने व जय्यत तयारीने लढविण्याचा चंग बांधला. ब्रिटिश सेना बेल्जममध्ये पाठविण्यात आली.तथापि नाझी युद्धयंत्रापुढे टिकाव लागणार नाही ह्मणून इंग्लंडच्या बचावासाठी डकर्कहून तीन लाख ब्रिटिश सैन्य परत इंग्लंडमध्ये बोलविण्यात आले. त्या सैन्याने नाझी युद्ध यंत्राच्या सामर्थ्याची व हुकुमशाहीखाली भरडणा-या यूरोपीय जनतेची केविलवाणी वस्तुस्थिति यांची कल्पना ब्रिटिश जनतेस आणून दिली. ताबडतोब ब्रिटिश जनता खाडकन् जागी झाली व तिने नाझीविरोधी युद्ध शेवटपर्यंत लढण्यास सरकारास भाग पाडले. ब्रिटिश मंत्रिमंडळात मजूर पक्षाचे काही पुढारी घेण्यात आले. चालू युद्धाला हुकूमशाही विरुध्द लोकशाहीचे युध्द असे स्वरूप स्पष्ट प्राप्त झाले. पुढे फ्रान्सचा पाडाव झाला. हिटलरने बाल्कन राष्ट्रे गिळंकृत केली. अखेरला नाझींच्या सोव्हिएट रशियावरील आक्रमणाने तर युद्धाचे स्वरूप अगदी निश्चित झाले. नाझीना जगातली लोकशाही नष्ट करून विश्व जिंकावयाचे आहे हे निःसंदिग्ध झाले. अर्थात् हुकूमशाही विरुद्ध इंग्लंड आणि रशियामधील जनतेने चालविलेला लढ्याला, लोकशाही करता साम्राज्यशाहीशी लढणाच्या हिंदी जनतेने मनःपूर्वक मदत करावयास हवी. अशाप्रसंगी काँग्रेस मंत्रिमंडळानी राजीनामे देऊन युद्धविरोधी अहिंसेचा प्रचार करणे ह्मणजे पर्यायाने हुकूमशाहीस सहाय्य करणे नव्हे काय ? हूकूमशाहीविरुद्ध स्पेन, चीन, अबिसिनिया इत्यादि राष्ट्रानी चालविलेल्या लढ्यास ब्रिटिशानी मदत करून हुकूमशाहीचा बीमोड करावा अथून ठराव करणाच्या काँग्रेसने, ब्रिटिशानी हुकूमशाहीविरुद्ध प्रत्यक्ष शस्त्र उगारल्यावेळी सत्याग्रहाचा मार्ग पत्करावा हे देशाचे दुर्दैव होयनाझीविरुद्ध जागतिक लोकशाहीने चालविलेल्या युद्धात मनःपूर्वक सहभागी होण्यास ९६ जनतेस भाग पाडून जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान काँग्रेसला