पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) सध्याचे युद्ध सुरू झाल्यापासून तर गांधीवादाचे स्वरूप अधिकाधिक उघडकीस येत आहे. गांधीवाद आणि राष्ट्रवाद यामध्ये चाललेला हिंदी लढा हा मृत भूतकाळ आणि जीवंत भविष्यकाळ यामधला लढा आहे. ही क्रांति आणि प्रतिक्रांति यामधली रस्सीखेच आहे. या रस्सीखेचीमुळे आपल्या देशाची राजनैतिक प्रगति स्थगित झाली असून जनता दिङ्मूढ बनलेली आहे. यूरोपच्या रणभूमीवर सांप्रत चाललेले सोव्हिएट–जर्मन युद्ध हे देखील क्रांति व प्रतिक्रांति यामधले अंतिम अंतरराष्ट्रीय युद्ध आहे. यावेळी खरा राष्ट्रवादी हा तटस्थ राहूच शकत नाही आणि जो राहतो तो पर्यायाने प्रतिक्रांतीलाच हात देतो असे ह्मणणे भाग आहे.अशावेळी गांधीवाद हा अहिंसेच्या निमित्याने हिंदी जनतेला युद्ध विरोध करण्यास लावून फॅसिझमला सहाय्य करीत आहे. गांधीवाद आणि नाझी तत्त्वज्ञान यात वैचारिक साम्य आहे हेच खरे ! राष्ट्रवादी दृष्टिकोण हा आपल्याला क्रांतीच्या विजयावर जागतिक संस्कृतीचे सरंक्षण, मानवी समाजाचा विकास, ख-या लोकशाहीचा उदय इत्यादि अवलंबून आहेत, हे पके जाणवितो आणि सांप्रतच्या नाझी-विरोधी युद्धात नेटाचा सहकार करण्यास प्रोत्साहन देतो. प्रतिक्रांतीच्या विजयात संस्कृतीचा विनाश, मध्ययुगीन झोटिंगशाहीचा अमल इत्यादि सामावलेली आहेत याचा तो इशारा देतो. । हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न हा आता केवळ राष्ट्रीय राहिलेला नसून आंतरराष्ट्रीय प्रश्नात विलीन झालेला आहे. नाझीवादाच्या यशस्वी आक्रमणाने जेथे अख्व्या जगाचे स्वातंत्र्य धोक्यात आणलेले आहे, तेथे हिंदुस्थानास तो कसचे स्वातंत्र्य देणार ? अशा प्रसंगी नाझीवादाचा यदा कदाचित् विजय झालाच तर हिंदुस्थानचे स्वातंत्र्य किती शतकानी दूरावेल, याची कल्पनाच करवत नाही. उलट, जगाची नाझीवादापासून सुटका करण्यासाठी चाललेल्या प्रचंड युद्धात नेटाने व स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यानेच हिंदु