पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) काँग्रेसचे युद्धविरोधी धोरण सुद्धा गांधीवादाचाच घातक परिणाम आहे. अर्थात्, आह्मास स्वतंत्र व्हावयाचे असेल तर ही वस्तुस्थिति बदललली पाहिजे. सर्व दुःखांचे मूळ असे हिंदी बहुजनसमाजातले अज्ञानमूलक मागासलेपण नाहीसे होऊन त्या समाजास राजनैतिक ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. ते ज्ञान प्राप्त झाले ह्मणजे बहुजनसमाजास आपल्यामधल्या क्रांतिकारी प्रेरणेची जाणीव होईल; आपण पूजित असलेल्या पुढा-यांचे सत्य स्वरूप त्याच्या नजरेत भरेल; व अखेर बहुजनसमाजास आपल्यामधल्या प्रचंड शक्तीबद्दल विश्वास वाटून त्यामधील गुलामगिरीमुळे आलेले भीति व निराशावाद हे दोष अंतर्धान पावतील. आह्मी हिंदी लोक सदा सर्वकाळ दुस-यावर विसंबून राहाणारे लोक आहोत. खुद्द आमच्यावरसुद्धा आमचा विश्वास नाही ! मग अज्ञानात रुतलेल्या आणि मागासलेल्या अशा शेतकरी आणि इतर दरिद्री जनतेची कथा काय ? तुरुंग भरून स्वातंत्र्य मिळवू पाहणारे काँग्रेसजन घ्या. त्यांच्यातील शेकडा नव्याण्णव लोकाना हिंदुस्थान आत्मप्रयत्नाने स्वातंत्र्य मिळवील असे वाटत नाही ! हा आत्मविश्वासाभाव अगर निराशावाद हाच त्याना गांधीवादाची कास धरण्यास भाग पाडतो. | आपली सुशिक्षित जनता जर इतकी दुबळी, तर आपला मागसलेला बहुजनसमाज कसा असेल याची कल्पना सहज करता येईल. महात्मा गांधी काही तरी चमत्कार करून आपली स्थिति सुधारतील असे त्याच्या अज्ञ व भोळ्या मनास वाटते. सारांश, बहुजनसमाजाच्या अज्ञानातून गांधीनी महामागिरी प्राप्त करून घेतलेली आहे. चमत्कार घडवून आणण्याचे ह्मणजे आपली स्थिति सुधारण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे अशी जनतेत जाणीव निर्माण झाली ह्यणजे, गांधीना बाजूस सारून ती आपले स्वातंत्र्य आपल्या मनगटाच्या जोरावर मिळवील. दारिद्य, दुःख, अधःपात इत्यादींचे सातत्य हे, हिंदी जन-मनावरील गांधीवादाची पकड दूर करून, खरा राष्टवाद त्या जनतेत उत्पन्न करील यात शंका नाही,