पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४) स्थानचे स्वातंत्र्य समीप येऊन ठाकणारे आहे. सध्या हा एकच स्वातंत्र्याचा मार्ग उरलेला आहे. याशिवाय अन्य कोणताही मार्ग हिंदुस्थानास गुलामगिरीत कायम खितपत ठेवणारा आहे. खरा राष्ट्रवाद हाही (हिंदी समाजाची प्रगति व उत्कर्ष ही ज्याचे ध्येय आहे,)आपल्याला हा एकच मार्ग दर्शवितो. असा क्रांतिवादी दृष्टिकोण मराठी वाचकापुढे ठेवण्याचा कॉ. सुंटणकर यानी या ग्रंथद्वारे जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. मराठी वाचकानी हे पुस्तक मननपूर्वक वाचावे अशी त्याना माझी शिफारस आहे. Dehra Dun 28 th July 1941. 27.72.