पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद। १४६ याप्रमाणे हिंदुस्थानात क्रमाक्रमाने राज्यक्रांति आणि समाजक्रांति घडवून आणणारा साम्राज्यविरोधी लढ्याचा हा कार्यक्रम रॉय यानी काँग्रेसपुढे आणि हिंदी जनतेपुढे सादर केला. या रॉयप्रणीत सिद्धान्तालाच * राष्ट्रीय लोकसत्ताक क्रांती ' चा सिद्धान्त असे नाव देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाची पूर्ण अमलबजावणी झाली ह्मणजे हिंदुस्थान देश हा आपण आणि यूरोपीय राष्ट्रे या मधले दोनशे वर्षांचे अंतर गाठून त्या राष्ट्राच्या योग्यतेस चढेल. त्या राष्ट्रांच्या पदवीस चढण्यास हिंदी राष्ट्राने-जनसत्तेची प्रस्थापना-शेतकरीक्रांति-औद्योगीकरण-समाजशाहीत संक्रमण-ही सोपान परंपरा आक्रमिली पाहिजे. परंतु काही केल्या हा क्रांतिकारी कार्यक्रम काँग्रेस पुढा-यांच्या पचनी पडेना. इतक्यात १९३९ चा सप्टेंबर महिना उजाडला आणि प्रचलित महायुद्धास तोंड लागले. साम्राज्यविरोधी लढ्याचे स्वरूप पालटले. वास्तविक नाझी आक्रमणाविरुध्द ब्रिटिश साम्राज्यशाहीने पुकारलेले युद्ध आकस्मिक होते. साम्राज्यशाही आणि हुकूमशाही या दोन्ही भांडवलशाहीच्या दोन निरनिराळ्या अवस्थेतीत भांडवलशाहीची भिन्न भिन्न रूपेंच होत, त्यात परस्पर-विग्रह असणे शक्य नसते. साम्राज्यशाही ही उत्कर्षित भांडवलशाहीची परिणतावस्था होय; तर हुकूमशाहीचा उदय हा भांडवल. शाहीच्या दिवाळखोरी अवस्थेतून होत असतो. या दोहोंचा रोख निसर्गत: यातील कामगारशाही विरुध्द असणे वाजवी होते. तसे होतेही पण.ब्रिटिश मरख्यप्रधान चेंबरलेन हे म्युनिकच्याप्रमाणे हिटलरपुढे आणखी एक लोटांगण घालण्यास सज्ज होते. पण हिटलरच्या उतावळेपणामुळे हिटलरला पोलंडचे भक्ष्य देऊन शांत करण्यास चेंबरलेनसाहेबाना संधि मिळाली नाही. पुढे युद्ध पुकारले तरी, चेंबरलेनचे सरकार मनापासून युद्ध लडेना आणि युद्धाची जय्यत तयारीही करेना. त्या सरकारला हिटलरशी कसाबसा तह करून युद्ध आटोपते घ्यायचे होते; पण डेन्मार्क व नार्वे पडल्याबरोबर ब्रिटिश जनता चकित झाली, आणि तिने चेंबरलेन सरकारविरुद्ध एकच हलकल्लोळ