पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- १४५ क्रांतिवाद सामर्थ्य घटना समितीत प्राप्त होत नसते. ज्यावेळी जनतेच्या दैनंदिन झगड्यातून घटना समिति उत्क्रांत होईल, त्याचवेळी साम्राज्यशाहीकडून सत्ता हिसकावून घेण्याची पात्रता तिच्यामध्ये निर्माण होईल. काँग्रेसने जर बहुजन समाजाचे आर्थिक लदे आपल्या हाती घेतले, व स्थानिक काँग्रेस समित्या या जर जनतेच्या आर्थिक झगड्याची केन्द्रे ह्मणून वावरू लागल्या, तर योग्यकाळी बहुजन समाजाची प्रातिनिधीक संघटना ह्मणून तिचे घटनासमितीत रुपांतर का होणार नाही ? घटना समितीला निमंत्रण देण्याचा ही अत्यंत नजीकचा मार्ग आहे. पण यासाठी काँग्रेसची घटना व स्वरूप यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले पाहिजे.सध्या काँग्रेस ही बहुजनसमाजाची शिस्तनिष्ठ संघटना असण्याऐवजी ती बहुजनसमाजाची अशी एक निव्वळ चळवळ आहे. ह्मणून तिला साम्राज्य–विरोधी लढ्याचे बळकट केन्द्र,अर्थात् हिंदी जनतेचा क्रांतिवादी पक्ष बनविले पाहिजे.तेव्हाच ती घटना समितीत रुपांतरित होऊन साम्राज्यविरोधी लढा यशस्वी करून दाखवू शकेल.” घटना समितीच्या योगाने सत्ता काबीज केल्यानंतर राष्ट्राचा सामाजिक विकास कसा करावा यासंबंधीही रॉय यांचे खालील मार्गदर्शन आहे. कोणत्याना कोणत्याहि रूपाने साम्राज्यशाहीला दरसाल अडीचशे कोट रुपयांचा तनखा पोचतो व संस्थानिक, राजेरजवाडे हे दरसाल प्रजेचे दोनशे कोट रुपये नाहक गिळंकृत करतात. त्या द्रव्यौवाचा उपयोग शेती सुधारणे, उद्योग धंदे उभारणे इत्यादि गोष्टी अमलात आणण्याकडे केला तर हिंदभूमीतील सर्व उत्पादनशक्ती खुल्या होऊन अल्पावधीत चहूकडे संपत्तीचे झरे वाह लागतील. भूमितिश्रेढीने हिंदुस्थानचा आर्थिक व औद्योगिक विकास होण्यास सरवात होऊन जगातल्या अव्वल दर्जाच्या राष्ट्रांच्या पंक्तीस जाऊन बसण्यास आपल्या मायभूमीस रशियापेक्षाही थोडा काळ लागेल. कालक्रमानुसार जागतिक परिस्थितीस अनुलक्षन तिचे समाजशाहीत पदापर्णही आपो आपच होईल, २२