पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १४४ क्रांतिकारी आहे. आझाला हिंदी सरंजामशाहीची जागा पटकविणा-या साम्राज्यशाहीचे राज्ययंत्र जे पार्लमेंट, त्याच्या स्वयंमन्य सत्तेला आव्हान दिले पाहिजे. साम्राज्यशाहीच्या अनियंत्रित सत्तेमुळे आमचा सामाजिक व राजनैतिक विकास खुटलेला आहे; आपली जनता दारिद्य, दुःख व मंदमरण ( Slow death ) यानी व्याकुळ झालेली आहे. ह्मणून ब्रिटिश पार्लमेंटला आमचे राजकीय भवितव्य ठरविण्याचा अधिकार नाही. तो अधिकार आपल्या जनतेचा आहे. आमची राज्यघटना बनविण्याचा अधिकार आमचा आहे. आह्मी आमचे राज्ययंत्र उभारून आमच्या देशाचा सामाजिक, राजकीय व आर्थिक विकास घडवून आणणार आहोत. या स्वयंनिर्णयाच्या तत्वासाठी आमचा राजकीय लढा चालू आहे. फ्रेंच राज्य क्रांतीच्या वेळी राजाचा देवी के विरुद्ध लोकसत्ता हा जसा झगडा चालू होता, त्याच प्रमाण आमच्या देशाच्या सद्यःस्थितीत आमचे भवितव्य ठरविण्याचे साम्राज्यशाहीचे अधिकार विरुद्ध आपले भवितव्य आपणच विण्याचे जनतेचे अधिकार ( ह्मणजेच जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क ) सा लढा चालू केला पाहिजे. सैणजे आमची राज्यघटना बनविण्याचा अधिकार पार्लमेंटला नाही; तो आह्मी निवडून दिलेल्या प्रतीनिधी–सभेचा आणजेच घटना समितीचा आहे असे सक्रिय आव्हान देणे हेच पार्लमेंटचे घटना बनविण्याच्या अरेरावीस जनतेचे समर्पक उत्तर आहे. या घटना समितीच्या मागणी भोवती हिंदुस्थानातील क्रांतिप्रवण शक्ती गोळा करून सत्ता काबीज केली पाहिजे असा रॉय यांचा अनुभवपूर्ण संदेश होता. । काँग्रेसचेच घटनासमितीत रूपांतर करावे असे कॉ. रॉय यांचे ह्मणणे होते. ते असेः-* घटना समिती ही केवळ चळवळीची अगर प्रचाराची घोषणा नसून ती कृतिक्षम घोषणा आहे. घटना समिती ही स्वर्गातून गळून पडत नसते. दैनंदिन आर्थिक झगडे खेळून धीट व शिस्तनिष्ठ बनलेल्या क्रांतिवादी जनतेचे भरभक्कम पाठबळ असल्याशिवाय, सत्ता ग्रहण करण्याचे