पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ क्रांतिवाद करी, किरकोळ दुकानदार, कारागीर, बेकार बुधिजीवि इत्यादि शेकडा नव्वद जनता होय ! या वर्गानीच सत्ता काबीज करून बहुजनसमाजाच्या आकांक्षा परिपूर्ण करणारी अशी जनसत्ता प्रस्थापित केली पाहिजे. त्या आकांक्षा ह्यणजे शेतक-यास जमीन व कामगार आणि बेकार सुशिक्षित यांच्यासाठी औद्योगीकरण या आकांक्षा क्रांतीच्या ह्मणजे साम्राज्यविरोधी लढ्याच्या कार्यक्रमात प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. पण ती सत्ता कशी काबीज करावयाची हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्यासाठी कॉ. रॉय यानी घटना समितीचे (Constituent Assembly) तंत्र शोधून काढले. घटना समिती ही जीवनातील दैनंदिन गरजासाठी चालविलेल्या बहुजनसमाजाच्या आर्थिक लढयातून उत्क्रांत झाली पाहिजे आणि तिच्या द्वारे बहुजनसमाजाने साम्राज्यशाहीच्या हातात असलेली सत्ता ग्रहण केली पाहिजे असे रॉय यांचे साम्राज्यविरोधी लढ्यातील प्रमुख तंत्र होते. यानंतर सत्ता हाणजे काय व तिचा घटना-समितीमार्फत ग्रास कसा करावयाचा यासंबंधी रॉय काय ह्मणतात ते पाहू. साम्राज्यशाहीत परिणत पावलेल्या ब्रिटिश भांडवलशाहीने आपली राजकीय सत्ता हिंदुस्थानावर कायम राहावी ह्मणून हिंदी नोकरशाहीची कडेकोट संघटना उभारलेली आहे. या संघटनेत ब्रिटीश सत्ता वास करीत आहे. अर्थात् ती सत्ता हिंदुस्थानावर कायम राहावी ह्मणून हिंदी नोकरशाहीच्या पोलादी चौकटीतून ती सत्ता काढून दुस-या क्रांतीकारक संघटनेत ओतणे असाच होतो. तेव्हा राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी प्रचलित राज्ययंत्राइतकीच एक क्रांतिकारक राजकीय संघटना निर्माण करण्यास हवी. विशेषतः विसाव्या, शतकात राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी संघटित हत्यार असणे अत्यावश्यक आहे; आणि हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीत हे शस्त्र ह्मणजे घटना समिती होय, घटना समितीचे स्वरूप हे आव्हानात्मक झणजेच