पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १४२ असल्यामुळे ते आपल्या राष्ट्रीय लढ्यास पायबंद घालून अखेर मारून टाकते; ह्मणून पर्याय असे क्रांतीवादी नेतृत्व उभारून त्या नेतृत्वाच्या हाती राष्ट्रीय चळवळीची सूत्रे आली पाहिजेत, ह्मणजे ते नेतृत्त्व बहुजनसमाजास राजकीय स्वातंत्र प्राप्त करून देऊन त्याची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता करील अशी शास्त्रशुद्ध विचारसरणी का. रॉय यानी जनतेपुढे, त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये मांडली. आधी स्वातंत्र्य ह्मणजे काय, ते कोणकोणत्या वर्गास हवे आहे, स्वातंत्र्य हे ध्येय नसून हिंदी समाजाचा विकास घडवून आणण्याचे ते एकमेव साधन कसे आहे, बहुजनसमाजाची आर्थिक गा-हाण्यावर संघटना करून साम्राज्यविरोधी स्वातंत्र्याचा लढा कसा उभारावा, त्या लढ्यातून लोकसत्तेची प्रस्थापना करून अखिल राष्ट्राचे औद्योगीकरण कसे घडवून आणावे इत्यादींची झणजे राज्यक्रांति आणि तदुत्तर समाजक्रांति या सत्यसृष्टीत कशा उतरविता येतील याची विज्ञानशुद्ध मीमांसा करणारा राष्ट्रीय लोकसत्ताक क्रांतीचा सिद्धांन्त कॉ. रॉय यानी आपल्या 'इंडिपेंडंट इंडिया' या साप्ताहिकाच्या द्वारे हिंदी जनतेस सादर केला. त्या सिद्धांताची आता संक्षिप्त मांडणी करू, कॉ. रॉय यांचे ह्मणणे असे आहे की साम्राज्यशाही अतिक्रमणामुळे आपला देश इतर युरोपीय राष्ट्रापेक्षा सामाजिक, राजकीय व औद्योगिक दृष्ट्या निदान दोनशे वर्षे मागे आहे. ते अंतर आपल्या देशास भरून काढावयाचे आहे. ते कसे करावयाचे ? तर ज्या साम्राज्यशाहीने आपल्या राष्ट्राचा विकासक्रम थोपवून धरलेला आहे, तिच्या हातून आह्मी सत्ता काबीज करून घेतली पाहिजे. ह्मणजे राज्यक्रांति घडवून आणली पाहिजे, लोकसत्ता प्रस्थापित केली पाहिजे. हे कार्य कोणते वर्ग करू शकतील १ तर ज्या वर्गाना साम्राज्यशाही अर्थकारणाच्या चौकटीत स्थान नाही, किंबहुना ती चौकट पोल्याशिवाय ज्या वर्गाचा विकास होणे शक्य नाही असे वर्गच साम्राज्यविरोधी लदयास तयार होतील. हिंदुस्थानात असे व झणजे, शेतकरी, काम