पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ क्रांतिवाद कॉ. रॉय १९३६ इसवीच्या नोव्हेंबर महिन्यात तुरुंगातून सुटून येण्यापूर्वी त्यांच्या क्रांतिवादी मतांची छाप काँग्रेसच्या वेळोवेळी पास झालेल्या ठरवावर दिसून येते. लाहोर येथील इतिहास–प्रसिद्ध अधिवेशनात पास झालेला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आणि तदनुसार घडून आलेला बहुजनसमाजाचा उठाव हे दोन्ही, त्यानी हिंदुस्थानभर परदेशातून सतत दहा वर्षे फैलाविलेल्या क्रांतिवादाचा परिपाक होय. कराचीच्या काँग्रेसच्या अधिवेशनप्रसंगी डॉ. महमूद या नामधारी वेषात कॉ. रॉय हे हजर होते. अर्थात् त्यांच्या मतांचा ठसा कराचीच्या ठरावावर उमटल्याशिवाय कसा राहणार ? नंतर तुरुंगात गेल्यावर देखील तेथून हस्तपत्रके आणि ग्रंथ लिहून ते प्रसिद्धीसाठी बाहेर पाठवीत असत. त्यांचा प्रसार देशभर होई. त्याचा परिणाम युवकावर होऊन विविध समाजवादी मताचे पंथ देशात निर्माण होऊ लागले; या समाजवाद्यांच्या द्वारे लखनौ येथील काँग्रेसच्या अधिवेश. नात रॉयप्रणीत क्रांतिवादी विचारसरणी आपला छाप बसवीत होतीच, हे अध्यक्षीय भाषण व लखनौच्या अधिवेशनात पसार झालेल्या ठरावावरून नि:संदिग्ध होतेच. पुढे ते तुरुंगातून सुटून आल्यानंतर फैजपूर अधिवेशनप्रसंगी संपूर्ण स्वातंत्र्य याचा अर्थ बहुजनसमाजाने सत्ता काबीज करणे असा करविण्यात त्यांच्याच हात होता. त्याचप्रमाणे फैजपूरचा शेतकरी कार्यक्रमाचा ठरावही त्यांच्या दिद्र्शनाखालीच बनविण्यात आला. यानंतर जनतेपुढे आणि काँग्रेसपुढे त्यानी कोणकोणते क्रांतिवादी कार्यक्रम सादर केले आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये क्रांतिवाद आणि गांधीवाद यामध्ये झगडा सुरू होऊन काँग्रेस ही अखेर गांधीवादात कशी निर्वाण पावली हे आता पाहू. फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनानंतर कॉ. रॉय यानी माक्र्सप्रणीत क्रांतीवादानुसार साम्राज्यविरोधी लढ्याचे तत्त्वज्ञान, तंत्र आणि कार्यक्रम जनतेपुढे विशद करून मांडण्यास प्रारंभ केला. काँग्रेसमधील बहुजनसमाज व त्याचा लढा क्रांतिकारी असला तरी गांधीवादी नेतृत्व प्रतिगामी स्वरूपाचे