पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १४० सुटणार आहे. या चुकीच्या धोरणासंबंधात कॉ. डांगे हेही ह्मणतात की, ' यावेळी कम्युनिस्ट पक्षाने कामकरी संघाची मदत घेऊन, सत्याग्रहात पडणा-या राष्ट्रीय क्रांतिकारक जनतेच्या आघाडीस जाण्याचे धोरण राखावयास पाहिजे होते, ते त्याने केले नाही. भांडवली पुढान्यांनी वरील गोष्टीचा फायदा घेऊन काँग्रेसनिशाणाखाली जमणाच्या जनतेला असे पटविले की, कम्युनिस्ट हे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्याविरुद्ध आहेत. याच्या उलट कम्युनिस्ट पक्षाने काय केले ? तर काँग्रेसवर व तिच्या पुढा-यावर शिव्यांची लाखोली वाहून तो जनतेच्या विश्वासास अपात्र ठरला. काहीकाळ भाई झणजे * पारिभाषिक शब्दांच्या तोफांची सरबत्ती देणारा एक विलक्षण प्राणी आहे' असा प्रवाद जनतेच्या तोंडी ऐकू येऊ लागला. एकंदरीत क्रांतिवादी दृष्टिकोनाने केलेली राष्ट्रीय चळवळीची छाननी मात्र लोकाना पटत चालली. कामकरी, शेतकरी व मध्यमवर्ग यांचे लढ्यातील महत्त्व सर्वाना पटल्यामुळे काँग्रेसने १९२२ सालापासून जो कार्यक्रम कम्युनिस्ट सतत काँग्रेसपुढे मांडत आले होते, त्यातला बराच भाग आपल्या * मूलभूत हक्कां'च्या. ठरावात कराचीला समाविष्ट केला. तेव्हांपासून काँग्रेस ही संस्था शेतकरी व कामकरी यांची आहे असे सर्वाना वाटू लागले. लाहोर काँग्रेसपासून पं. जवाहरलालजीनी समाजवादाचा जो सतत प्रचार चालविला, आणि कराची व फैजपूर येथे आर्थिक कार्यक्रम व शेतकरी कार्यक्रम यासंबंधी जे ठराव पसार करून घेतले त्यामुळे, राष्ट्राने मार्क्सवादी अर्थात् क्रांतिवादी दृष्टिकोनाच्या चळवळीत प्रचंड प्रगति केलेली होती यांत शंका नाही. यानंतर रॉय हे १९३६ मध्ये तुरुंगातून सुटून आल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व समाजविकासाच्या माक्र्सप्रणीत दृष्टीने, कोणता कार्यक्रम देशापुढे ठेवलेला आहे, त्याचे विवेचन आता करावयाचे आहे.