पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११ ) साठी सगळी हिंदी जनता धडपडत आहे,अशावेळी, शिव शिव ! एक व्यक्ति पुढे सरसावते,तिच्याभोवती भविष्यवादी महात्मा ह्मणून सगळी जनता गोळा होते; पण ती व्यक्ति अहिंसेच्या नावाखाली हिंदी राष्ट्रास इतर राष्ट्राप्रमाणे सन्मानाने जगण्यासाठी स्वतंत्रपणे धडपड करण्यास प्रतिबंध करते.खरोखरच गांधीवाद हे निष्क्रिय आणि निधनप्रवण तत्त्वज्ञान आहे. उलटपक्षी, राष्ट्रवाद ही तेजस्वी जीवनासाठी धडपड आहे. वस्तुतः ज्याना आहे त्या वस्तुस्थितीत बदल नको आहे त्यानी अहिंसेचे तुणतुणे वाजविलेले शोभते. परंतु देशाचे स्वातंत्र्य आणि प्रगति ही प्राप्त करून घेण्यासाठी सज्ज झालेल्या हिंदी जनसेनेचे नेतृत्व पत्करून हिंदुस्थानास स्वातंत्र्याप्रत नेणा-या शक्तीना गांधीजी अहिंसेचा बांध घालताहेत हे विचित्र होय. अहिंसातत्त्वाचा विजयाने हिंदुस्थानच्या कपाळी कायमची गुलामगिरी बसणार हे पक्के समजा; कायमची गुलामगिरी आणि मरण यात फरक तो कोणता ? तेव्हा हिंदुस्थानास जर जगावयाचे असेल तर क्रांति दिव्यातून पार पडण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. ह्मणूनच हिंदी राष्ट्रवाद हा क्रांतीच्या तत्त्वज्ञानाने स्फू झाला पाहिजे. पण गांधीवाद हे प्रतिक्रांतीचे तत्वज्ञान आहे. | याप्रमाणे गांधीवाद आणि राष्ट्रवाद यामध्ये दोन ध्रुवाचे अंतर असता दोन्ही एकच समजले जातात, किंबहुना गांधीवादासाठी राष्ट्रवाद बाजूला सारला जातो हे किती आश्चर्यजनक आहे बरे १ हिंदी राष्ट्रवाद्यानी आता राष्ट्रवाद सोडून देऊन गांधीवादाची पूर्ण दीक्षा घेतलेली आहे.आणि ती सुद्धा मनापासून नव्हे, तर गांधींच्या जुलमाखाली. महात्माजी आणि त्यांचा गांधीवादे यांच्या उत्पत्तीला कारण बहुजनसमाजामधले अज्ञान, अंग्रश्रद्धा, विभूतिपूजनबुद्धि इत्यादि होत. गांधीवाद हे आपल्या जनतेमधले अज्ञान, भेकडपणा, निराशावाद, मागासलेपण इत्यादींचा ह्मणजे जनतेत जे काही अत्यंत वाईट आणि टाकाऊ आहे, त्या सर्वांचे प्रदर्शन आहे !