पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतिवाद १३७ पत्र चालूच होते. ही मंडळी कामगारवर्गात जाऊन थोडीबहुत चळवळही करत होती. कलकत्यात मुझफर अहमद यांचा व पंजाब, यू. पी. वगैरे भागात उस्मानी व मजीद यांचा असे गट यथामति कामगारचळवळी करीत असत. या सर्व गटांचा एक संघटित पक्ष करण्याचा उपक्रम १९२५ मध्ये सुरु झाला. तदनुसार उपर्युक्त पक्षस्थापना व परिषद ही घडून आली. | मध्यंतरी, १९२५ सालापासून १९२८ पर्यंतच्या अवधीत कामगारांचे झालेले शेकडों संप, शेतक-यांचे उठाव, पांढरे सायमन कमिशन आणि त्यावरील बहिष्कार, यातूनच उद्भवलेला सत्याग्रह संग्राम आणि सरकारने टाकलेला गोलमेजपरिषदेचा डाव इत्यादींचे विवेचन या पूर्वीच्या * गांधीवाद' या प्रकरणात करण्यात आलेले आहे. त्यांची येथे पुनरुक्ति नको. | क्रांतिवादी चळवळ नुकतीच कोठे हिंदुस्थानात मूळ धरू लागलेली होती. हिंदुस्थानात त्यावेळी चीनच्याप्रमाणे काहीसा बलवान् कम्युनिस्ट पक्ष असता, तर चीनच्या लढ्याप्रमाणेच हिंदी लढ्यास बाणेदार वळण लागले असते. हिंदी कम्युनिस्ट पक्षाला काँग्रेसमध्ये थारा न मिळण्यास, काँग्रेसचे अर्धवट सरंजामी, अर्धवट भांडवली असे संमिश्र पुढारीपण हेच कारण झाले. शिवाय कामगारवर्ग मागसलेला असून त्याला राजकीय शिक्षण मिळालेले नव्हते. तेव्हा कम्युनिस्ट पक्ष सुसंघटित कसा होईल यासंबंधी रॉय यांचे तत्कालीन विचार मननीय आहेत. प्राप्त परिस्थितीत कम्युनिस्टांचे बळ वाढवावयाचे ह्मणजे कामगारवर्गाने राष्ट्रीय क्रांतीच्या लढ्यात स्वतः भाग घेणे हा एकच मार्ग कामगाराना मोकळा आहे. काँग्रेस ही क्रांतिकारक संस्था आहे व राष्ट्रीय सभेने साम्राज्यविरोधी लढा यशस्वीपणे जिंकावा असे । ज्या तरुणाना वाटते, त्यानी कामगारवर्गाला या लढ्यामध्ये भाग घ्यावयास लावूनच ते कार्य साधता येईल. या लढयातूनच क्रांतिकारी कामगारपक्ष निर्माण होईल. कम्युनिस्ट पक्षाची वाढ व संघटना याना जोम येईल, पण हे रॉयप्रणीत धोरण सहाव्या इंटरनॅशनल परिषदेपर्यंत सर्वत्र मान्य २१