पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १३८ झालेले होते. व तदनुसार हिंदुस्थानात कार्यही चालले होते. मात्र १९२९ नंतर जेव्हां रॉय यांना इंटरनॅशनलमधून महत्त्वाच्या मतभेदामुळे दूर करण्यात आले, त्यावेळेपासून हिंदी कम्युनिस्ट चळवळीची काही वर्षे रेवडी उडून गेली याचे आता वर्णन करावयाचे आहे. कॉ. रॉय यांचा कम्युनिस्ट इंटरनॅशनलशी मतभेद होण्यास कारण इंटरनॅशनलने आंतरराष्ट्रीय कामगारचळवळीविषयी व वसाहतीविषयी आखलेले चुकीचे व यापूर्वी निर्दिष्ट केलेले असे एकान्तिक धोरण होय. १९२८ मधल्या सहाव्या परिषदेने ठराव पास करून हिंदी राष्ट्रीय काँग्रेस ही भांडवलदारांची प्रतिक्रांति संस्था आहे. जवाहरलाल नेहरूसद्धा सर्व काँग्रेसचे पुढारी साम्राज्यशाहीचे बगलबचे आहेत, तेव्हा काँग्रेसशी हिंदी कम्युनिस्टानी कोणताही संबंध ठेऊ नये असा सल्ला दिला, रॉय याना है धोरण अत्यंत आत्मघातकी असे वाटले. कारण हिंदुस्थानातला अपक, अल्पसंख्य, मागसलेला, अडाणी व अननुभविक असा असणारा कामगारवर्ग हा, इतर वर्गाशी, तसेच इतर क्रांतिप्रवण वगच्या बलाढ्य संस्थाशी फटकून वागून क्रांतीची धुरा एकाकी वाहण्यास असमर्थ आहे असे रॉय यानी ठासून सांगितले. राजकीय चळवळीचा पारा वेगाने चढत असताच इंग्लंडमध्ये गोलमेजपरिषद भरली होती. गोलमेजपरिषदेविरुद्ध घटनासमितीची घोषणा करण्याच्या ऐवजी हवेत तरंगणारी आपली कम्युनिस्ट मंडळी ‘ कामगारांचे बंड, सोलापुरात ' सोव्हिएट सत्तेची स्थापना' अशा विदेशीय घोषणांचा मारा सुरू करू लागली. काँग्रेसच्या निशाणाखाली साम्राज्यविरोधी लढा चालू होता; लोकावर लाठीमार होत होता; हजारो तरुण स्त्रीपुरुष तुरुंगात डांबले जात होते. अशावेळी काँग्रेस ही भांडवलशाही संस्था आहे असे झणून हिंदुस्थानात सोव्हिएट-स्थापनेची घोषणा करीत राहणे ह्मणजे, स्वतःच्या अकरेचे प्रदर्शन करण्यासारखे होते, आणखी काय ! हिंदी