पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १३६ नावहि कोठे ऐकू येत नसे. महायुद्धानंतर मात्र ही स्थिति पालटली. कामगारांचे संप होणे हा नेहमीचा शिरस्ताच होऊन राहिला, कामगारसंघाची स्थापना ठिकठिकाणी होऊ लागली. १९१९ ते १९२४ सालापर्यंत कापडाच्या व तागाच्या गिरण्या, लोखंडी व पोलादी कारखाने, कोळशाच्या खाणी, रेल्वे या ठिकाणी मोठमोठाले संप घडून आले. कामगारांनी संघस्थापनेस सुरवात केळी. कामगारांच्या या संघटनेच्या अगदी सुरवातीस ब्रिटिश साम्राज्यशाहीने दडपशाहीचे हत्यार उपसले. १९२४ सालांत कित्येक काँग्रेस कार्यकर्त्यास, त्यांनी कामगार चळवळींत भाग घेतल्याच्या आरोपावरून पकडण्यांत येऊन त्यांस तुरुंगात डांबण्यांत आले व हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्यसत्ता नष्ट करण्यासाठी कॉ. रॉय यांच्या सहकार्याने कट केल्याच्या आरोपावरून इं. पि. कोड १२१ कलमाप्रमाणे भाई डांगे, उस्मानी, भाई मुझफर अहमद, भाई गुप्ता व इतर काही तरुण कार्यकर्ते यांच्यावर खटला भरण्यांत आला. हा खटला कानपूर कटाचा खटला या नावाने प्रसिद्ध आहे. या खटल्यातून हे आरोपी निर्दोषी सुटतील अशी आशा नव्हतीच व अपेक्षेप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांना निरनिराळ्या मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या. या खटल्यांत जो महत्वाचा ह्मणून पुरावा कोर्टापुढे सादर करण्यांत आला, त्यांत मुख्यतः कॉ.रॉय याच लेख, पत्रे, जाहीरनामे यांचाच विशेष भरणा होता. खालच्या कोटोन आरोपीना शिक्षा फर्माविल्या व या शिक्षेविरुद्ध हायकोर्टाकडे अपील करण्यात आले. अलाहाबाद हायकोर्टानें अपील फेटाळून देऊन खालील कोटान दिलेल्या शिक्षा कायम केल्या. । १९२४ या खटल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाची उघड उघड स्थापना झाली, व १९२५ मध्ये कानपूर येथे कम्युनिस्ट परिषदहि भरविण्यात आली. हिंदुस्थानात ठिकठिकाणी कम्युनिस्ट गटही तयार होत होते. मुंबई गटात कॉ. डांगे, मिरजकर, घाटे, पर्वते इत्यादि मंडळीचे * सोशालिस्ट' नायचे