पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ क्रांतिवाद येऊन ठेपला. | हिंदुस्थानात क्रांतिवादी चळवळीचा पाया घातला जाण्यास कारणीभूत होणारे रॉय, तो पाया तर्कशुद्ध घातला जावा यासाठी थर्ड इंटरनॅशनलमध्ये कमालीची धडपड करीत होते. १९२० साली मान्य झालेल्या रॉय यांच्या हिंदुस्थानविषयक प्रबंधाला १९२२ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पुनः पुष्टि देण्यात आली. मध्यंतरी दुस-या आंतरराष्ट्रीय परिषदेच्यावेळी लेनिनने वसाहतींच्या प्रश्नावर एक प्रबंध लिहिला होता. त्यावर लेनिन यानी रॉय यांचे मत विचारले. ब-याच महत्त्वाच्या गोष्टीवर रॉय यांचा लेनिनशी मतभेद झाल्यामुळे रॉय यानी आपला स्वतंत्र प्रबंध लिहून मतभेद दर्शविला. काँग्रेसमध्ये दोन्ही प्रबंध पुढे मांडण्यात आले व त्यावर पुष्कळ वादविवादही झाला. सरतेशेवटी भवति न भवति होऊन दोन्ही प्रबंध मान्य करण्याची शिफारस स्वतः लेनिनने परिषदेस केली. पुढे १९२४ साली पांचव्या काँग्रेसने कॉ. रॉय यांचा दृष्टिकोन पूर्णपणे मान्य केला. १९२२ साली प्रसिद्ध झालेल्या * संधिकालचे हिंदुस्थान' या पुस्तकात रॉय यानी हा दृष्टिकोन विस्ताराने मांडलेला आहे. १९१९ ते १९२८ पर्यंत कॉ. रॉय हे थर्ड इंटरनॅशनलच्या पंचप्राणापैकी एक प्राण गणले जात असत. या आठ वर्षांच्या काळात तुर्कस्थान, इराण, चीन, हिंदुस्थान या देशातील कम्युनिस्ट चळवळीला वळण देण्याचे महत्त्वपूर्ण काम कॉ. रॉय यानी स्वीकारलेले होते. असो. या चळवळींचे हिंदुस्थानावर प्रत्यक्ष काय परिणाम झाले व क्रांतिवादी चळवळीची हिंदुस्थातात कशी प्रगति झाली याचा आता विचार करू, मुजफर महमद, उस्मानी इत्यादि वर उल्लेखिलेल्या आणि त्या वेळी मास्कोहून नुकतेच आलेल्या तरुणानी कामगारवर्गाच्या संघटनेकडे विशेष लक्ष देऊन कार्यास सुरवात केली. त्या संघटनेची दृश्येही लगेच दिसू लागली. महायुद्धाच्या कालापर्यंत हिंदुस्थानात संप किंवा कामगारसंघ यांचे