पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ हिंदी राष्ट्रवाद १३४ होती तेथेच या तरुणानी राहावे असा रॉय यानी त्याना सल्ला दिला, लष्करी शाळेला जोडून ‘ इंडिया हाउस' ह्मणून एक वसतिगृह काढण्यात आले होते. तेथे हे सर्व तरुण काही दिवस राहिले. रॉय स्वतः या हिंदी तरुणांची फार काळजी घेत असत, | कॉ. रॉय यांच्याशी जसजसा या तरुणांचा सहवास वाढू लागला, तसतसा त्यांच्या डोक्यातील धार्मिक कल्पनांची कोळिष्टके पार झडून निघाली. राजकीय स्वातंत्र्याची स्पष्ट अशी कल्पना त्याना येऊ लागली; व परत हिंदुस्थानात गेल्यानंतर कोणता मार्ग अवलंबावा याचा धडा रॉय यांच्या सहवासात तेथे त्याना मिळाला. काही तेथे लष्करी शिक्षण घेऊन तरबेजहि झाले. पुढे ' लष्करी शाळा' व ' इंडिया हौस' बंद झाल्यावर मारको येथील * प्राच्यविद्यापीठात त्यांच्या शिक्षणाची रॉय यानी सोय करून दिली. रॉय यांच्या सहवासात हिंदी राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा कसा चालवावा याचे त्याना उत्कृष्ट शिक्षण मिळालेले होते. प्रथम कॉ. फजल हुसेन व त्यानंतर उस्मानी हिंदुस्थानात येऊन दाखल झाले. हिंदुस्थानात आल्यावरोबर त्यानी ताबडतोब कार्याला सुरवात केली, बहुजनसमाजाला शिक्षण देऊन त्याना स्वातंत्र्याच्या लढ्यात खेचण्याचे कार्य मोठ्या मेहनतीचे व कुशलतेचे असते, बहुजनसमाजाच्या जागृतीचे काम हे राष्ट्रीय लढयाचा आत्मा आहे व हे कार्य करीत असताना वर्षानुवर्ष हिंदुस्थानात चरत असलेली ब्रिटिश साम्राज्यशाही स्वस्थ बसून ही चळवळ चालू देणार होती असे थोडेच आहे ! सुरवातीच्या काळात कॉ. रॉय यांच्या हाताखाली तयार झालेले दोन कार्यकर्ते, मुझफर अहमद व उस्मानी यानी कम्युनिस्ट ह्मणजेच क्रांतिवादी चळवळीचा पाया हिंदुस्थानात घातला.हळूहळू त्या चळवळीला अधिकाधिक कार्यकर्ते लाभू लागले. तात्काल हिंदुस्थान सरकारच्या रोषास ती पात्र झाली. १८१८ चा गंजलेला कायदा परजण्यात आला व लगेच काही तरुणावर सरकारचा पाहुणचार घेण्याचा प्रसंग