पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ क्रांतिवाद असे नसून, शेकडा ९० लोकांच्या हातात जेव्हा सत्ता येईल त्यावेळी हिंदी लोकाना स्वातंत्र्य मिळाले असे होईल.' हे उद्गार ब. दास यानी अध्यक्ष पदावरून काढले होते. या भाषणावर टीका करताना साम्राज्यवादी बातमी पत्रानी दे. दास यांच्यामध्ये कम्युनिझमचा संचार होत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला. या काळात कॉ. रॉय यांच्या लिखाणातून हिंदी राजकीय लढ्यासंबंधी स्पष्ट असे विचार बाहेर येऊ लागले व त्यांच्या विचारांचा पगडा हिंदी तरुणांच्या मनावर जास्त जास्त बसू लागला. म. गांधींच्या असहकारितेच्या चळवळीचा बोजवारा उडाल्यानंतर, साहजिकच तरुणांची मने दुसरे मार्ग शोधू लागली व रॉय यांच्या स्पष्ट विचारसरणीने त्या वेळच्या ब-याचशा काँग्रेस कार्यकत्र्याचे व क्रांतिकारक युवकवर्गाचे लक्ष रॉय यांच्याकडे लागून राहिले. . मध्यंतरी, १९२० च्या सुमारास मुसलमानांची पवित्र ठिकाणे मका व मदिना यावर ब्रिटन स्वारी करणार अशा समजुतीने, त्या पवित्र जागांचे संरक्षण करण्यासाठी काही मुसलमान तरुण स्वदेश सोडून, मुसलमानी देशात येऊ लागले होते. पवित्र ठिकाणांचे संरक्षण करणे हे आद्य कर्तव्य असे त्यास वाटले. काबूलमध्ये पाय ठेवल्यावर या मुसलमान तरुणांच्या डोळ्यात अंजन पडले. तेथे अमानुल्लाने धार्मिक पवित्र ठिकाणावर ब्रिटन स्वारी करणार वगैरे सर्व टूल व वायफळ गप्पा आहेत असे त्या तरुणाना पटवून दिले. तथापि ते हिंदुस्थानाला परत जाण्यास तयार होईनात. हे सर्व तरुण सुशिक्षित होते. ते परत फिरत नाहीतसे पाहून अमानुल्लाने त्याना त्रास देण्यास सुरू केले. त्याबरोबर काही जण मायदेशी परतले; व इतरानी रशियन तुर्कस्थानचा ग्रता धरला. वाटेत काहीना सशस्त्र अफगाण दरोडेखोरानी पकडले, पण त्यांच्या सुदैवाने ही बातमी कॉ. रॉय यांच्या कानावर गेल्यामुळे कॉ. रॉय यानी लागलीच सैन्य पाठवून त्यांची सुटका केली व त्याना रशियन । तुर्कस्थानात आणले; व ताशकंद येथे एक लष्करी शाळा काढण्यात आली