पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १३२ रॉय यांचे बरेच सहाय्य होत असे. या संस्थेचे कार्यकारी मंडळ व अध्यक्षमंडळ यांत रॉय याची निवडणूक झाली. कॉ. रॉय यानी लेनिनच्या सहकार्याने हिंदी राजकीय प्रश्नाबाबत एक प्रबंध यावेळी लिहिला. हिंदी राजकीय प्रश्नांची यात सांगोपांग चर्चा करण्यात आली होती.हिंदुस्थानात ल कम्युनिस्टानी तेथील राजकीय लढ्यात कोणते धोरण अमलात आणावयाचे याचे स्पष्ट दिद्र्शन त्यात केले होते. १९२० सालच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या द्वितीय अधिवेशनात तो प्रबंध मान्य करण्यात आला व तदनुसार वर उध्दृत केलेले इंटरनॅशनलचे वासाहतिक धोरण आखण्यात आले. किंबहुना कॉ. रॉय यांच्याचमार्फत बर्लिनमध्ये व्हॅनगार्ड नावचे पत्र वसाहतीतील कम्युनिस्ट चळवळीकरता इंटरनेशलनने सुरू केले. रॉय यांचे पहिल्यापासूनच असे ह्मणणे होते की, देशातील क्रांतिकारक विचाराच्या तरुणानी राष्ट्रीय क्रांतीचा कार्यक्रम देशापुढे ठेवण्यासाठी काँग्रेसमधून चळवळ करावी. १९२१ सालीच अहमदाबाद येथील काँग्रेसमध्ये हजरत मोहानी यानी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आणला होता. रॉय यानी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे बरेचसे सभासद व इतर देशकार्यकर्ते मिळून दोनअडीचसे हिंदुस्थानातील मंडळीशी परिचय करून घेऊन काँग्रेसच्या चळवळीची गाडी माक्र्सवादाच्या रुळावर यावी ह्मणून खटपट चालविली. त्याचेच प्रतिबिंब हजरत मोहानीच्या ठरावात, दासबाबूंच्या अध्यक्षीय भाषणात, व कम्युनिस्ट मंडळीनी वाटलेल्या पत्रकात दृग्गोचर होते. विशेषत: प्रत्यक्ष देशबंधु दास यांच्याशी रॉय यानी निकट परिचय करून घेतला. १९२२ साली गया काँग्रेसचे अधिवेशन कै. देशबंधु दास यांच्याच अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी त्यांचे जे अध्यक्षीय भाषण झाले, त्यातील महत्वाचा व अर्थपूर्ण भाग अद्याप हिंदी जनतेच्या कानात घुमत असेलहि. 'गोप्या नोकरशाहीऐवजी काळ्या नोकरशाहीचे राज्य हिंदुस्थानात झाले झणजे हिंदुस्थानला स्वराज्य मिळाले