पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ क्रांतिवाद जागतिक क्रांत्यांचा त्यांचा अनुभव ताजा आहे. असो, रॉयप्रणीत हिंदी क्रांतिवादाचे तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम विशद करून सांगण्यापूर्वी हिंदुस्थानात क्रांतिवादी चळवळीचा उगम आणि फैलाव कसा झाला याचा इतिहास देणे अत्यवश आहे. महायुद्धामुळे शेतकरीकामकन्यांची हवालदील झालेली वस्तुस्थिति । व रशियनक्रांति यशस्वी झाल्यामुळे नवविचारप्रवाहाची आलेली लाट या परिस्थितीतून हिंदी क्रांतिवादी चळवळीचा उगम झाला. याच सुमारास * थर्ड इंटरनेशनल ' या नावच्या कामगार च्या मध्यवर्ति जागतिक संस्थेचा लेनिनच्या नेतृत्वाखाली जन्म झाला. ही संस्था स्थापन करण्याच्या कामी कॉ. रॉय हेही एक प्रमुख होते. जी जी राष्ट्रे साम्राज्यशाहीच्या दडपणाखाली आहेत, त्याना त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत मदत करणे, हे तिस-या इंटरनॅशनलचे ध्येय व कर्तव्य आहे, असे तिच्या १९२० च्या दुसन्या अधिवेशनाने जाहीर केले आणि तदनुसार हिंदी राष्ट्रीय सभेच्या काही पुढा-याशी वाटाघाटी झाल्या. पण ते पुढारी शेतकरीकामकन्याच्या कार्यक्रमाला अत्यंत घावरले व त्यानी कम्युनिस्ट इंटरनॅशनलशी सख्य करण्यास विलक्षण किंबहुना अपमानास्पद अशा अटी घातल्यामुळे दोहोचा स्नेह जमण्याचे तसेच राहून गेले. उलट, पूर्ण स्वातंत्र्य संपादन करण्यासाठी क्रांति जर करावयाची व त्या क्रांतीचे जू शेतकरी-कामकन्यांच्या मानेवर ठेवावयाचे, तर त्यांची दैनंदिन गा-हाणी व आकांक्षा यांच्या पायावर कार्यक्रमाची उभारणी करणे अवश्य नाही काय, असा इंटरनॅशनलचा तर्कशुद्ध अभिय होता. ही इंटरनॅशनलची विचारसरणी नवोदित कम्युनिस्ट गटाने गया काँग्रेसमध्ये (१९२२) पत्रके वाटून प्रसृत केली. पण ब्रिटिशांच्या धमक्या व क्रांतीची भीति यामुळे त्रस्त झालेल्या कासेग्रधुरीणांच्या गळी काही केल्या, इंटरनॅशनलची क्रांतिवादी विचारसरणी उतरेना.

  • थर्ड इंटरनॅशनल' चे ध्येय, धोरण व कार्यक्रम ठरविण्यात कॉ.