पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १३० आरूढ होईल असे विज्ञानप्रणीत भविष्य माक्र्सने वर्तविलेले आहे. पहिल्या विकल्पानुसार क्रांति घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्नही पण हिंदी जनतेने काँग्रेसच्या जन्मापासून ते चालू महायुद्धास तोंड लागेपर्यंत ह्मणजे जवळजवळ ५४ वर्षे साम्राज्यविरोधी लढा देऊन केला, त्याचा साद्यंत इतिहास आतापर्यंत कथन करण्यात आलेला आहेच, सांप्रतच्या नाझीविरोधी युद्धाने ब्रिटनमध्ये घडवून आणलेल्या परिवर्तनामुळे, दुस-या विकल्पानुसार ब्रिटनमध्ये आणि तदुत्तर हिंदुस्थानात क्रांत्या घडून येण्याचा संभव मात्र नजरेसमोर स्पष्ट दिसतो आहे. क्रांतीच्या प्रक्रियेला इंग्लंडात सुरवात झालेली असून दिवसेदिवस कामगार पक्षाचे वर्चस्व तेथे जास्त जास्त वाढत असलेले दृग्गोचर होत आहे. ह्मणूनच मावसबादाचे हिंदी तज्ञ कॉ. मानवेन्द्रनाथ रॉय हे आपला साम्राज्यविरोधी लढ्याचा प्रबंध बाजूला ठेवण्यास सांगत असून हुकूमशाहीविरुद्ध ब्रिटिश कामगारानी चालविलेल्या सांप्रतच्या लढ्यात सहभागी होऊन हिंदी जनतेने ब्रिटिश कामगारांना विजय संपादन करण्यास मदत करावी असा सल्ला देत आले आहेत.सध्याचे युध्द सुरू झालेल्या घटकेस आंतरराष्ट्रीय साम्राज्यविरोध लढ्याचे पर्यवसान हुकुमशाहीविरुध्द जागतिक लोकशाहीच्या लढ्यात होते असलेले त्यांच्या सूक्ष्म आणि भेदक अशा माक्र्सवादी दृष्टीस स्पष्ट दिसन आले. चालू युद्धासंबंधाचे कॉ. रॉय यानी त्यावेळी काढलेले अनुमान नाझींच्या सोव्हिएट रशियावरील आक्रमणाने खरे ठरविलेले आहे. कॉ. रॉय हे हिंदी क्रांतिवादाचे प्रणेत आहेत. त्यानी १९२० सालापासून आतापर्यंत क्रांतीचे तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम यांचा सुसंगत विकास घडवून आणलेला आहे. कॉ. रॉय हे मुळचे प्रतिगामी राष्ट्रवादी, दहशतवादाच्या अवलंबनाने हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याच्या खटपटीत असता त्यानी अमेरिकेस प्रयाण केले, मेक्सिकोत क्रांति घडवून आणीत असता ते पक्की माक्र्सवादी बनले. त्यानी माक्र्सवाद आणि लेनिनवाद यांचा केलेला अभ्यास गाद असून अनेक