पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०)
यापेक्षाही नजरेत स्पष्ट भरणारी अशी गांधीवादातील आणखी काही उदाहरण घेऊ. हिंदी राष्ट्रीय आकांक्षा परिपूर्ण होण्यासाठी आपल्या समाजाच्या आर्थिक रचनेत मूलगामी बदल होणे जरूर आहे असे वर कथन केले आहे. पण गांधींना आपल्या समाजस्थितीत बदल नको आहे. उदाहरणार्थ, ऐतखाऊ जमिनदारी पद्धति गांधीना जीवंत ठेवावयाची आहे. आपल्या देशात बहुसंख्य जनता शेतक-यांची आहे. त्या जनतेला स्वातंत्र्य लव्यात जर सामील करून घ्यावयाचे तर जमिनदारीचे उच्चाटण हा राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग असणे अवश्य आहे; पण गांधीना या उच्चाटनात हिसेचा वास येतो. त्याना जमिनदार आणि कुळे यांचा संबंध पितापुत्रासारखा असावासे वाटते. आपल्या कुळावर पितृतुल्य प्रेम करण्याजोगे जमिनदारांचे हृदय परिवर्तन करता येईल असा गांधीना गाढ विश्वास आहे. वास्तविक तस कोटी किसान जनतेला दारयात डांबणान्या जमिनदारी पद्धतीचा विध्वंस केल्याविना राष्ट्राची प्रगति होणार नाही हे त्या महात्म्याला उमजत नाही. उलट, देशाची प्रगति खुटविणा-या जुन्या जीर्ण महारोगरूप सरंजामी सामाजिक संबंधाविरुद्ध जनतेच्या उठावात गांधीना हिंसा दिसते, परंतु शेतक-यांची सतत पिळणूक चालविणा-या सावकार-जमिनदारांच्या वर्तनात त्याना अहिंसा आढळून येते. असा हा विलक्षण गांधीवाद आहे.

हिंसेशिवाय प्रचालित वस्तुस्थितीत बदल घडून येणार नाही, किंबहुना हिंसा हा जीवनाचा धर्म आहे. जीवन ही एक अनेक स्थित्यंतरांची साखळी आहे. स्थित्यंतराच्या अभावी जीवनाची स्थिति ही साचलेल्या पाण्याच्या तलावासारखी होते, पण गांधीची अहिंसा ह्मणजे मानवी जीवनाच्या प्रक्रियेचा पूर्ण विराम होय. ज्या वेळी आपले राष्ट्रीय जीवन स्वातंत्र्यासाठी नव्या दमाने सुसमुसत आहे, ज्यावेळी भूतकालीन सामाजिक अवशेषांची दुगंधी प्रेते गाडून,नजीकच्या भविष्यकाली सुगंधी व स्वतंत्र वातावरण हुंगण्या