पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ क्रांतिवादाची पार्श्वभूम तितक्या तितक्या प्रमाणात त्याला निसर्गावर अधिकाधिक विजय संपादन करता येतील असा त्याचा ठाम निश्चय असतो. या भावनेमुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मकर्तृत्व यांची जाणीव निर्माण होते. आपल्या नशिबाचा धनी ईश्वर वगैरे कोण नसून आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत अशी त्याची खात्री असते. त्यामुळे आत्मबळाचा जोम त्याच्या अंगात नुसता मुसमुसत असतो. त्याच्या नखशिखांत क्रांतीचे चैतन्य खेळत असते. या मासल्याची वैचारिक क्रांति हिंदी समाजात घडून आली पाहिजे. ती घडवून आणण्यासाठी हिंदी बुद्धिजीवि जनतेने चंग बांधला पाहिजे. राज्यक्रांति किंवा समाजक्रांति घडवून आणण्यापूर्वी वैचारिक क्रांतीची पार्श्वभूमि तयार करावी लागते हेच आपल्याला जगाच्या इतिहास सांगतो, वर दिदर्शित केल्याप्रमाणे यूरोपमध्ये बेकन, डेका,व्हाल्टेर, कॅट, हेगेल,मार्क्स, एंगल्स इत्यादि युगप्रवर्तक विचारवंतानी वैचारिक क्रांति घडवून आणली, म्हणूनच १६८८ सालच्या इंग्रजी राज्यक्रांतीपासून ते तहत १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीपर्यंतच्या अवधीत अनेक यूरोपीय राज्यक्रांत्या आणि समाज-क्रांत्या घडून आल्या. अर्वाचीन विज्ञानविकास आणि औद्योगिक प्रगति ही त्याच क्रांत्यांचे मधुर फळ आहे. याच विचारवंतांच्या विचारप्रक्षोभक लिखाणानी यूरोपातील मध्ययुगीन कल्पना आणि श्रद्धा यांची होळी केली आणि त्यांच्या राखेतूनच नवे विज्ञानप्रणीत जग निर्माण करण्याच्या कार्याचा पाया घातला. चालू वीसाव्या शतकात देखील आपले विचार, आपल्या श्रद्धा, आपल्या चालीरीति ह्या मुख्यत्वेकरून मध्ययुगीन आहेत. आमचा दृष्टिकोण धार्मिक आहे. अंधश्रद्धेवर आमची सर्व भिस्त. दैनंदिन जीवनात आम्ही अगदी क्वचित् प्रसंगी बुद्धिवादी असलेले आढळून येतो. अशी जोवर वस्तुस्थिति आहे तोवर आमच्या राष्ट्रास स्वातंत्र्य मिळणे, तद्गत समाजाचा विकास होणे आणि आपल्या अभागी राष्ट्रास जगातल्या पुढार