पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १२६ । होऊच शकली नाही. आमच्या परकीय राज्यकर्त्यांनीही आपल्या स्वार्थासाठी. आमच्या जुन्या परंपरागत कल्पनावर आधारलेल्या सामाजिक संबंधावर, घटनावर आणि संस्थावर तजेला चढविण्याच्या कामी आपला हातभार । लावलेला आहेच. ह्मणून आह्मास राजनैतिक मुक्तता हवीच हवी. गुलमांच्या राष्ट्रास संस्कृति असूच शकत नाही ! परंतु ज्या प्राचीन परंपरापासून । आम्हास शेकडो वर्षे परदास्यात खितपत पडावे लागले आहे त्यांच्या बंधनातून आपली सुटका करून घेण्याचे धैर्य आपल्या अंगी आल्याशिवाय राजनैतिक स्वातंत्र्य मिळविण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येणार नाही. जोवर हिंदी बहुजनसमाज आपली अध्यात्मिकता, आपले धर्मवेड घालवून देत नाही, तोवर एहिक प्रगतीची गोष्टच काढू नका. नवी सृष्टि, नवी समाजरचना निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली मानवी चळवळ ही जगातल्या यच्चावत् हालचाली परमेश्वरी इच्छेनुसार चाललेल्या आहेत या धार्मिक कल्पनेशी जुळणारी नाही. धर्म हा जनतेपासून सर्व संगपरित्यागाची । अपेक्षा करतो; तो मानवाना सर्वस्वी देवावर भार टाकून राहण्यास शिकवितो, म्हणजे त्याना तो दैववादी बनवितो; धार्मिक विचारपद्धति ही मानवातील स्वतंत्र प्रतिभा नाहीशी करून टाकते; त्यामधील क्रांतिकारी मनःप्रवृत्ति मारून टाकते; प्रचलित समाजव्यवस्था किंवा चालू राज्यपद्धति ही ईश्वरनिर्मित आहे अशी त्यांची भावना करून सोडतो. म्हणून त्याविरुद्ध बंड करण्यास धार्मिक विचारसरणीचा मनुष्य धजत नाही.परमेश्वरी शक्तीच्या काल्पनिक इच्छेवर विसंबून राहणारा हा मनुष्य मनाने गुलाम, कमकुवत, बावळट आणि कसल्याही वस्तुस्थितीत समाधान मानून घेणारा बनतो. त्याच्यातील सर्व कर्तृत्व शक्ति नष्ट होऊन जाते. | हे एक चित्र झाले! याच्या उलट चित्र विज्ञानप्रणीत विचारसरणीच्या मनुष्याचे असते. विज्ञान निर्माण करून मानवानी निसर्गाला जिंकले आहे. असे त्याला वाटते, तसेच मानव हा जितके जितके जास्त प्रयत्न करील,