पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ क्रांतिवादाची पार्श्वभूमि त्मक बुध्दिवादाच्या कसास लावली पाहिजेत ! ह्मणजे आपल्यास असे कळून चुकेल की ती सर्व, स्वातंत्र्य-प्राप्ति करून देण्याच्या कामी तसेच सामाजिक प्रगति घडवून आणण्याच्या कामी अगदी कुचकामाची आहेत. याचा अर्थ असा नव्हे की यूरोपातून आलेल्या सर्वच्या सर्व कल्पना आपण स्वीकाराव्या. त्या कल्पना प्रचलित हिंदी वस्तुस्थितीस कितपत जुळणा-या आहेत हे आपण आपल्या बुद्धिवादाच्या कसास लावून पाहावे. मार्क्सची किंवा लेनिनची सर्वच्या सर्व वाक्ये म्हणजे आप्तवाक्ये किंवा वेदवाक्ये अशी मानण्याची प्रथा काही हिंदी युवकात पडत चाललेली आहे. हा सुद्धा आपल्या बौद्धिक गुलामगिरीच्या सवयीचा परिणाम आहे. कल्पना कोणत्याही असोत, मग त्या प्राचीन असोत अगर अर्वाचीन असोत, त्या प्राच्य असोत किंवा पाश्चात्य असोत; त्या ग्रहण करण्यापूर्वी आपल्या चिकित्सक अशा टीकात्मक बुद्धीच्या कसास लावून त्या आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या आणि सामाजिक प्रगतीच्या कामी उपयुक्त असतील तरच ग्रहण कराव्या. यूरोपमध्ये १७।१८ व्या शतकात झालेल्या वैचारिक क्रांतीच्या चळवळीचे अंतर्गत स्वरूप असेच होते. हिंदी वैचारिक क्रांतीची जळवळ हाती धरणान्यानी मध्ययुगीन आचारविचारातून यूरोपची मुक्तता करणा-या अठराव्या शतकातील रूसो व्हाल्टेरसारख्या फ्रेंच तत्त्ववेत्यापासून स्फूर्ति मिळविली पाहिजे आणि हिंदी समाजाची मध्ययुगीनता झणजे त्यातील पैर्तृक परंपरा, (patriarchal traditions ), वर्णाश्रममूलक नानाविध ज्ञातिविषयक उच्चनीच श्रेणीकल्पना, प्राचीन चालीरीती इत्यादि समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. तात्पर्य, अशात-हेची वैचारिक क्रांति घडून आल्याशिवाय राजकीय किंवा सामाजिक क्रांति आपल्या देशात घडून येणेच अशक्य. आपले राजकीय प्रश्न आणि संस्कृति सुधारणा या संबंधाचे प्रश्न यांचे परस्पर संबंध अत्यंत निकट असेच आहेत. आमच्या राजकीय गुलामगिरीमुळे क्रांतिकारक कल्पनांचा येथे उदय होण्यास अनुकूल वस्तुस्थिति निर्माण