पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १२४ घडामोडी चाललेल्या आहेत अशी भामची श्रद्धा आहे. एका वाक्यात सांगावयाचे झणजे हिंदी बहुजनसमाजाची मनोवृत्ति ही ईश्वरवादी ह्मणजेच दैववादी आहे. त्याना ईश्वर इच्छेनुरूप चाललेल्या प्रचलित वस्तुस्थितीमध्ये बदल घडवून आणणे पाप वाटते. साम्राज्यशाही आक्रमण हे देखील ईशेच्छेचाच परिणाम आहे असे तो समाज मानले. ह्मणून साम्राज्यविरोधी लढा चालविण्यापूर्वी बहुजनसमाजाच्या मनावर जी परमेश्वरी साम्राज्याची पकड आहे ती ३ वी नष्ट केली पाहिजे. तेव्हा आहााला जर राजकीय स्वातंत्र्य मिळवावयाचे आहे,तर वैचारिक क्रांतीची चळवळ ह्मणजे आपल्या भूतकालाकडे आणि रूढ परंपराकडे चिकित्सक दृष्टीने पाहावयास शिकविणारी बौद्धिक चळवळ ही आधी हाती घेतली पाहिजे. एकादा गृहस्थ आमचेजवळ आला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत का सामील व्हावे यासंबंधी चिकित्सा करू लागला, तर स्वातंत्र्याच्या चळवळीपासून त्या गृहस्थाचे हित होणारे आहे व त्यास सुख लागणार आहे अशी त्याची खात्री आह्मास करून देता आली पाहिजे ह्मणजे मनापासून तो स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग वेईल. स्वातंत्र्य-प्राप्ति ही आपल्या प्रगतीच्या मार्गातील अनेक अडथळे व अडचणी नाहीशी करील आणि सर्व समाजाचे आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्न ती सोडवील असे अखिल जनतेच्या बुद्धीस पटवून दिले ह्मणजे सगळी जनता स्वातंत्र्याच्या चळवळीशी समरस होईल. त्यातल्या त्यात आमच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत एकप्रकारचा जोम, एकप्रकारचा उत्साह आणि एकप्रकारची एकजूट निर्माण व्हावयास पाहिजे, तर आमच्या मनावर जी हजारो वर्षांच्या जुन्या मतांची आणि रूढींची पकड आहे, तीतून आपल्या मनाची मुक्तता झाली पाहिजे. ते कसे करावयाचे ? आपला इतिहास, आपल्या सामाजिक परंपरा, आपली प्राचीन विचारपध्दति, आपले तत्त्वज्ञान आणि धार्मिक मते आणि अखेर जीवनाकडे पाहण्याच्या आपला प्रचलित दृष्टिकोण इत्यादि सर्व चिकित्सक हाणजे टीका