पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ क्रांतिवादाची पार्श्वभूमि भविष्यकालीन प्रगतीस हातभार लावणारे भूतकालात काही तरी सापडले तर त्याचा भविष्यकालास उपयोग करून घ्यावा. त्यासाठी आमच्या मागील इतिहासाची आह्मी चिकित्सक दृष्टीने छाननी केली पाहिजे. याचा अर्थ आह्मी बौद्धिक अगर बुद्धिप्रामाण्याची चळवळ अख्या देशभर उटवून दिली पाहिजे. या चळवळीच्या नांगरणीने स्वातंत्र्याचे बी पेरण्यास अनुकूल अशी भूमिका या देशात तयार होईल. आतापर्यंत आह्मी हाती धरलेल्या चळवळी का फसल्या ? कारण आह्मी आमच्या भूतकालाचे नाहक गोडवे गातो. आह्मास आमच्या जुन्या जीर्ण झालेल्या कल्पना आणि परंपरा यांचे पुनरुज्जीवन करावयाचे आहे. एवढेच नव्हे तर या कल्पनांचे आणि परंपरांचे लोण आहाास जगातल्या कोन्या-कोपच्यापर्यंत पोचवावयाचे आहे असे आह्मी ह्मणतो. जगास आह्मास संदेश द्यावयाचा आहे या कल्पनेत आह्मी रममाण होतो. आह्मास आमचाच उद्धार करता येत नाही, तर आह्मी जगास कसे तारणार या गोष्टीचा आह्मास विसर पडतो. भूतकालाकडे हणजे मागे दृष्टि ठेवून आह्मास पुढे झणजे भविष्याप्रत जाता तरी येईल कसे ? भूतकालापासून स्फूर्ति मिळविण्याची कल्पनाच आधी आपण सोडून दिली पाहिजे. आपण जगाच्या इतिहासाकडे सूक्ष्म आणि सखोल दृष्टीने पाहू लागलो, तर आपल्याला असे आढळून येईल की जगातील अर्वाचीन पुढारलेल्या राष्ट्राना आपल्या भूतकाळाची राखरांगोळी केल्याशिवाय आपल्या वैभवाचा भविष्यकाळ उभारता आला नाही. त्या राष्ट्रानी आक्रमिलेले मार्ग आक्रमण्याशिवाय आह्मास दुसरी गति नाही. राजनैतिक क्रांति किंवा सामाजिक उठाव घडून येण्यापूर्वी वैचारिक क्रांति घडून आलीच पाहिजे हेच आह्वास जगातील प्रत्येक पुढारलेल्या राष्ट्राचा इतिहास सांगतो.आमच्या विचार करण्याच्या पद्धतीस शेकडो वर्षांच्या सवयीमुळे धार्मिक वळण लागलेले आहे. एका निसर्गातील शक्तीच्या इच्छेनुसार जगातल्या सर्व