पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १२२ आपण पारखे झालो आहोत, आपल्याला आता तो मानवी विकासाचा टप्पा गाठावयाचा आहे. त्यासाठी आपल्याला पाश्चात्यापासून पुष्कळ गोष्टी शिकावयाच्या आहेत. सांस्कृतिक दृष्ट्या आपण स्वयंपूर्ण आहोत असे समजून घेणे हे देशहितविघातक आहे. | तेव्हा, ज्या वैचारिक क्रांतीच्या चळवळीने यूरोपमधल्या मध्ययुगीन विचारसरणीचा निरास घडवून आणला आणि यूरोमध्ये नव्या सामाजिक चळवळीना चालना देणारी आणि बहुजनसमाजास अधिकाधिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणा-या राजनैतिक दृष्टिकोणास प्रसवणारी आधुनिक विज्ञानप्रणीत विचारसरणी विकास पावण्यास अनुकूल अशी वस्तुस्थिति निर्माण केली, त्या वैचारिक क्रांतीच्या चळवळीचा सूत्रधारी आत्मा कोणता हे आता पाहूं. तो झणजे इतिहासाचे चिकित्सक दृष्टीने निरीक्षण करणे हा ! झणजे आपल्या परंपरागत कल्पना, सर्व भूतकालीन वैचारिक घटना, रूढ मानवी संस्था, इत्यादि सर्व सारासार विवेकबुद्धीच्या कसोटीस लावून त्यात आपल्या सामाजिक विकासास सहाय्य करणारे काय आहे आणि त्यास अडथळा आणणारे काय आहे याचे संशोधन करणे, एवढे करून स्वस्थ बसावयाचे नाही, तर भूतकालातील आपल्या ज्या कल्पना, वैचारिक घटना आणि संस्था आपल्या सामाजिक प्रगतीस उपयुक्त आहेत तेवढ्या ठेवून बाकीच्या सर्व वज्यं करणे, असे पहा की जर आह्मास अर्वाचीन राष्ट्र या नात्याने प्रगति करावयाची आहे, त्याचप्रमाणे जर आमच्यातील दुःखांचे डोंगर, अज्ञानाचा अंधार, धर्मवेडाचा कळस, मागसलेपणाची परिसीमा, दराग्रहांची कोळिष्टके इत्यादि आयास समूळ नष्ट करावयाची आहेत, तर यूरोपने तसे करण्यास जी दिशा धरली, त्या दिशेने आह्मास जावयास नको काय ? केवळ भूतकालाच्या चिंतनाने आही जगू शकत नाही. उलट, भूतकालाच्या वेडामधून आह्मी आमची मुक्तता करून घेतली पाहिजे. भूतकाल हा मेलेला आहे, त्याला आह्मी गाडले पाहिजे. आता आमच्या