पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ क्रांतिवादाची पार्श्वभूमि ठेवण्यात आलेली आमच्या सुशिक्षितांची मने अर्थात् आपल्या देशाच्या मागील इतिहासाकडे पाहून समाधान मानून घेऊ लागली. उत्साहविध्वंसक अशा निराशाजनक वर्तमान काळास कंटाळलेले हिंदी बुध्दिजीव साहजिकच भूतकाळास कवटाळू लागले व त्यातून स्फूर्ति प्राप्त करून घेण्याची अपेक्षा करू लागले. आमची प्राचीन संस्कृति फार उच्च दर्जाची होती, आमचे पूर्वज बौध्दिक श्रेष्ठतेच्या परमोच्च बिंदूपर्यत पोचलेले होते, आमची प्राचीन संस्कृति व बुध्दिवैभव यापुढे पाश्चात्य संस्कृति हिणकस ठरते, ती संस्कृति भौतिक आहे आणि आपली संस्कृति अध्यात्मिक आहे अशा घातुक विचाराना आपले शिक्षित तरुण बळी पडू लागले. वास्तविक अशा विचारांचे जाळे पसरून त्यात आपल्या होतकरू युवकाना अडकावून निष्क्रिय करण्याचा किपलिंगसारख्या साम्राज्य मुत्सद्यांचा हा डाव आहे. 'East is East and West is West and the twin shall never meet' या किपलिंगच्या सूत्राचा मूळ उद्देश हा की आह्मी आमच्या अध्यात्मिक विचारात तल्लीन व प्राचीन वैभवाच्या कल्पनातर्क होऊन स्वस्थ बसावे आणि पाश्चात्यानी आमच्या सर्व भौतिक गरजा-राज्य करण्यापासून ते सुई टाचणीसारख्या क्षुद्र वस्तू पुरविण्यापर्यंत-भागवाव्या. पूर्व ही अध्यात्मवादी आणि पश्चिम ही भौतिकवादी असे तरी का। ह्मणावे ? हिंदुस्थानात भौतिकवाद नव्हता की काय ? अगर जगाच्या भौतिक संस्कृतीत हिंदुस्थानाने काहीच का भर घातली नाही ? आमच्या प्राचीन पूर्वजानी संपादिलेल्या भौतिक ज्ञानावर आणि अनुभवावर अर्वाचीन पाश्चात्य संस्कृति काही अंशी आधारलेली आहे. मग पाश्चात्यानी वाढविलेल्या । विज्ञानप्रणीत भौतिक संस्कृतीचा उपयोग आपला देश उत्कर्षित करण्यास आपण का करू नये ? आयी पाश्चात्यांच्या मागे राहिलो यात आमचा काहीच अपराध नाही. काही ऐतिहासिक घडामोडीमुळे ह्मणजे परदास्य बौद्धिक कोंडमारा, आर्थिक पिळणूक इत्यादि कारणामुळे मानवी विकासास १९